आपल्यासोबत कधी तरी असे नक्कीच झाले असेल की, एखादी गोष्ट समोर दिसते. पण प्रत्यक्षात मात्र ती नसतेच. यालाच डोळ्यांचा धोका म्हटले जाते. अनेकदा असे वाटते की, आपण नुकतीच पाहिलेली गोष्ट म्हणजे डोळ्याचा धोका होती. कारण कधी-कधी जी गोष्ट दिसते, ती प्रत्यक्षात नसते आणि कधी-कधी जी गोष्ट असते, ती दिसत नाही.
आपल्याला इंटरनेटवर, डोक लढवावं लागेल, असे अनेक ऑप्टिकल इल्यूजन (optical illusion) फोटो मिळतील. विशेष म्हणजे, सोशल मीडिया युजर्सना अशी कोडी सोडवण्यातही मोठा रस आहे. मात्र, या फोटोने लोकांच्या डोक्याचा पार भूगा केला आहे. मात्र, हा फोटो शेअर करणाऱ्याने यात, मांजर अथवा हरीण दिसत असल्याचा दवा केला आहे. पण, या फोटोत प्राणी शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मात्र या फोटोत, केवळ आडव्या-उभ्या-तिरप्या रेषाच दिसत आहेत. हा फोटो @tlhicks713 या ट्विटर युजरने शेअर केला आहे. आतापर्यंत अनेकांनी या पोटोला लाईक केले असून अनेकांनी रिट्विटही केले आहे.
हे केवळ एक ऑप्टिकल इल्यूजन!हा फोटो शेअर करत या ट्विटर युजरने लिहिले, आपले डोके कसे काम करते (उजवा अथवा डावा मेंदू) यावर अवलंबून आहे. या पॅटर्नमध्ये आपल्याला एक मांजर अथवा एक मूस (एक प्रकारचे हरीण) दिसू शकेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आपल्याला जो कोणता प्राणी दिसेल, तो या फोटोचा भाग नाही. हे केवळ आपल्या डोक्याने तयार केलेले एक ऑप्टिकल इल्यूजन आहे. एवढेच नाही, तर आपण या पॅटर्नचा कोणताही भाग झूम करून पाहिला तर आपला भ्रम (इल्यूजन) दूर होईल.
लोकांना दिसली मांजर... -तसेच एका युजरने तर, जर तुम्हाला काहीही दिसत नसेल, तर स्क्रीन तुमच्यापासून दूर करा. असे केल्यानंतर त्यात एक मांजर दिसत असल्याचे त्या यूजरने दर्शवले आहे.
लोकांना कोणताच प्राणी दिसला नाही - हा फोटो अनेकांनी अत्यंत लक्षपूर्वक पाहिला. कदाचित आपणही यात प्राणी शोधण्याचा प्रयत्न करत असाल. पण या ट्विटच्या कमेंट सेक्शनमध्ये काही युजर्सनी, यात कुठलीही मांजर वैगेरे दिसत नाही, असे लिहिले आहे. मात्र, एका युजरने यात मला मांजर दिसली दिसली... पण नंतर,... मला या फोटो शिवायदेखील मांजर दिसत आहे...लोल, असे लिहिले आहे. याच प्रकारे आपल्याला काही दिसले, की नाही? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा...