Optical Illusion: इंटरनेटवर एकापेक्षा एक अतिशय रंजक कोडी शेअर केली जातात. असाच एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक मेंढी लपलेली आहे. ही मेंढी नक्की कुठे आहे, हे तुम्हाला शोधायचं आहे, पण हे कोडं सोडवताना तुमच्या नजरेचा चांगलाच कस लागणार आहे. हे कोडे सोडवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असले तरी मेंढी शोधण्यात केवळ काही लोकांनाच यश आले आहे. या फोटोतील मेंढी तुम्हाला जितक्या लवकर सापडेल, तितका तुमचा मेंदू तल्लक आहे, असं तज्ञ्जांचे मत आहे. पाहा तुम्हाला शोधता येतेय का चित्रातील मेंढी...
चित्रातील मेंढी शोधण्याचा हा प्रवास आणखी मजेशीर करता येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये १० सेकंदांचा टायमर सेट केला पाहिजे आणि मग फोटो पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसं केलं तर तुम्हाला पटकन लपलेली मेंढी दिसण्याची शक्यता जास्त आहे. दिलेल्या वेळेत मेंढी दिसली तर तुमचा मेंदू आणि डोळे खूप तीक्ष्ण आहे. जर तुम्हाला या चित्रात मेंढी दिसत नसेल तर फोटोच्या मध्यभागी योग्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. फोटोची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की आपले मन पुन्हा पुन्हा इकडे तिकडे जाईल. जर तुम्हाला बरोबर उत्तर मिळाले नसेल, तर खालील फोटोमध्ये मेंढ्यांचे स्थान पाहा...
अवघ्या १० सेकंदात मेंढी शोधणे खरोखरच अवघड काम आहे. दिलेल्या वेळेत योग्य उत्तर शोधण्यात फार कमी लोक (सोशल मीडिया यूजर्स) यशस्वी झाले आहेत. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल तर तुम्ही देखील जिनिअस लोकांच्या यादीत सामील झाला आहात.