Optical Illusion Find the Cat: आपले मन आणि डोळे दोन्ही तीक्ष्ण ठेवण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजन हा एक मजेदार मार्ग आहे. हा भ्रम फोटो, चित्रे किंवा स्केचच्या कोणत्याही स्वरूपात असू शकतो. काही ऑप्टिकल इल्यूजन तुमच्या मेंदूला चालना देत असते. काही वेळा असे फोटो तुमचे निरीक्षण कौशल्य आणि IQ तपासतात. अशी चित्रे दिसतात तितकी साधी नसतात. किंबहुना, या चित्रांमध्ये दिलेल्या चॅलेंजचे गूढ उकलताना भल्याभल्यांनाही घाम फुटतो. आज आम्ही तुमच्यासाठी असंच एक मजेदार 'ऑप्टिकल इल्यूजन टेस्ट' घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला १० सेकंदात फोटोत लपलेली मांजर (spot the cat in photo) शोधायची आहे.
खालील चित्रात तुम्हाला अखंड अशी घरं दिसत आहेत. यात घरांच्या गराड्यात एक मांजरदेखील हळूच जाऊन लपून बसली आहे. परंतु ती शोधण्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम निरीक्षण कौशल्याची आवश्यकता आहे. हे ऑप्टिकल इल्यूजन सोडवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ मिळणार नाही, कारण तुमच्याकडे फक्त १० सेकंदच आहेत. त्यामुळे तुमचा टाइमर सेट करा आणि फोटोकडे एक नीट बारकाईने बघा. फोटो झूम करून पाहिलात तरीही तुम्हाला ती मांजर लगेच दिसू शकेल. ज्यांचे निरीक्षण कौशल्य उत्तम आहे, त्यांना तर मांजर सहज दिसेल.
आजकाल सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन आणि ब्रेन टीझर खूप लोकप्रिय होत आहेत. लोकांनाही असे चॅलेंजेस सोडवायला मजा येते. काय मग.... तुमच्यापैकी किती जणांना मांजर सापडली? कारण तुमची १० सेकंद तर संपलीत....
जर तुम्ही अजूनही लपलेली मांजर शोधू शकले नसाल तर काळजी करण्याची गरज नाही. खाली आम्ही तुमच्या सोयीसाठी या ऑप्टिकल इल्युजन चाचणीचं उत्तरही दिलंय. एका वर्तुळात मांजर कुठे लपलेली आहे ते नीट सांगितले आहे. पाहा उत्तर-