शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आज ऑर्डर करा परवा मिळेल! १०-२० नाही, तर तब्बल १७ हजारांचं एक सँडविच; पाहा काय आहे खास?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 9:35 AM

सँडविच खायला आपल्या सर्वांनाच आवडतं. पण एका रेस्तराँमध्ये असं सँडविच विकलं जात आहे जे सर्वांनाच परवडणारं नाही.

खाण्यापिण्याच्या महागड्या पदार्थांबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. काही वेळा एखाद्या डिशची अवाजवी किंमतही आपण ऐकली असेल. आता ही माहिती एका सँडविचशी संबंधित आहे. साधारणपणे सँडविच म्हटलं तर ५०-१०० रुपये किंवा जास्तीतजास्त १५० रुपये असा आपला समज असतो. पण, न्यूयॉर्कमधील Serendipity 3 या रेस्तराँनं काही काळासाठी आपल्या मेन्यूमध्ये खास सँडविचचा समावेश केलाय. हे क्विंटेसेंशियल ग्रील्ड चीज सँडविच जगातील सर्वात महाग सँडविच आहे, ज्याची किंमत २१४ डॉलर्स म्हणजेच सुमारे १७,५०० रुपये आहे.

या सँडविचमधील खास पदार्थ आणि प्रचंड किंमतीमुळे या सँडविचचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं आहे. हे सँडविच बनवणाऱ्या सेरेंडिपिटी ३ रेस्तराँच्या नावे सर्वात महागडं डेझर्ट, सर्वात महाग हॅम्बर्गर, सर्वात महाग हॉट डॉग आणि सर्वात मोठा वेडिंग केक यांचीही नोंद आहे.

विशेष शँपेन ब्रँडचा वापरयामध्ये डोम पेरिग्नॉन शॅम्पेनपासून बनवलेल्या फ्रेन्च पुलमन शॅम्पेन ब्रेडचा वापर करण्यात येत असून त्यात विशेष प्रकारचं व्हाईट ट्रफल बटर टाकण्यात आलं आहे. यामध्ये अतिशय अनोखे आणि महाग कॅसिओकाव्हॅलो पोडोलिको चीज वापरण्यात येतं.

आज ऑर्डर करा परवा मिळेलआणखी अजब बाब म्हणजे हे सँडविच खाण्यासाठी एखाद्याला किमान ४८ तास अगोदर ऑर्डर द्यावी लागते. विविध ठिकाणांहून सामान मागवलं जात असल्यानं ते बनवण्यासाठी इतका वेळ लागतो. स्पेशल चीजमध्ये ग्रिल केल्यानंतर ते त्रिकोणाच्या आकारात कापलं जातं आणि २३ कॅरेट एडिबल गोल्ड फ्लेक्ससह विशेष Baccarat crystal प्लेटमध्ये सर्व्ह केलं जातं. सोबतच Baccarat ग्लासमध्ये Lobster Tomato Bisque देखील दिलं जातं.

टॅग्स :foodअन्नAmericaअमेरिका