Woman with a watch painting : कलेची आवड असणाऱ्या जास्तीत जास्त लोकांना स्पेनमधील महान चित्रकार पाब्लो पिकासो हे माहीत आहेत. लोक त्यांच्या पेंटिंगचे फॅन आहेत. त्यांची एक फेमस पेंटिंग ‘वुमन विद अ वॉच’ (Woman with a Watch) नुकतीच 13.9 कोटी डॉलरला विकली गेली. भारतीय करन्सीनुसार ही किंमत 11.57 अब्जांपेक्षाही जास्त ठरते. यासोबतच ‘वुमन विद अ वॉच’ या लिलावात विकली गेलेली सगळ्यात महागडी कलाकृती ठरली आहे.
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, याआधी 2015 मध्ये पिकासो यांची एक पेंटिंग साधारण 15 अब्ज रूपयांपेक्षा जास्त किंमतीला विकली गेली होती. ‘वुमन विद अ वॉच’ पेंटिंग पाब्लो पिकासो यांनी 1932 मध्ये बनवली होती. त्यांनी या पेंटिंगमध्ये फ्रान्सची मॉडल मेरी-थेरेसी वाल्टरला पेंट केलं होतं. मेरी पिकासोची प्रेयसी होती आणि पिकासो यांनी त्यांच्या अनेक कलाकृतींमध्ये तिला स्थान दिलं होतं. पेंटिंगमध्ये मेरी सिंहासनासारख्या खुर्चीवर बसलेली दाखवली आहे. लिलाव करण्याआधी या पेंटिंगला 12 कोटी डॉलर किंमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
17 वर्षांची असताना पिकासोला भेटली होती वाल्टर
लिलाव करणारे सोथबी यांच्यानुसार, लिलावात ठेवण्याआधी या पेंटिंगची किंमत 120 मिलियन अमेरिकन डॉलर होती. याआधी ही पेंटिंग एमिली फिशर लॅंडो यांच्याकडे होती. त्यांनी ही पेंटिंग 1968 मध्ये खरेदी केली होती.
मेरी-थेरेसी वाल्टर 17 वर्षाची होती जेव्हा ती पॅरिसमध्ये 45 वर्षीय पिकासो यांना भेटली होती. नंतर ती प्रेमात पडली. पण त्यांचं लग्न एका यूक्रेनी बॅलेरीना ओल्गा खोखलोवासोबत झालं होतं. यानंतर वाल्टर पिकासो यांच्या अनेक पेंटिंगचा विषय बनली होती. 1932 मधील त्यांची कताकृती फेम न्यू काउची यातीलच एक आहे. या पेंटिंगचा 2022 मध्ये लिलाव करण्यात आला होता. तेव्हा या पेंटिंगला 67.5 मिलियन डॉलर किंमत मिळाली होती.