शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

गर्लफ्रेंड बनवत होती व्हिडीओ, तिच्या डोळ्यांसमोर झाला प्रियकराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 3:11 PM

Boyfriend died in front of Girlfriend: 26 वर्षीय  स्कॉट सेडॉनसोबत ही दुर्घटना घडली. तो ग्रीस सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला होता. त्याला पॅडबोर्डिंगची खूप आवड होती.

(Image Credit : Daily Star)

Boyfriend died in front of Girlfriend:  असं म्हटलं जातं की, व्यक्तीचा जन्म आणि त्याचा मृत्यू दोन्हीही त्याच्या हातात नसतो. कुणासोबत कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. सेकंदात होत्याचं नव्हतं होतं. असंच काहीसं सुट्टी एन्जॉय करत असलेल्या एका तरूणासोबत झालं. तो समुद्रात मस्त सर्फिंग करत होता. अचानक त्याच्यावर वीज पडली आणि सगळं संपलं.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, 26 वर्षीय  स्कॉट सेडॉनसोबत ही दुर्घटना घडली. तो ग्रीस सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला होता. त्याला पॅडबोर्डिंगची खूप आवड होती आणि यासाठी ग्रीसमधील Rhodes हे ठिकाण त्याने निवडलं. पण स्कॉटला अजिबात याचा अंदाज नव्हता की, त्याच्यासोबत काय होणार आहे. त्याला हेही माहीत नव्हतं की, तो आयुष्यातील शेवटचं पॅडलबोर्डिंग करत आहे.

गर्लफ्रेंडच्या डोळ्यांसमोर गेला जीव

तसा तर स्कॉट ब्रिटनमध्ये राहतो त्याने ग्रीसमध्ये हॉलिडे हाउस बनवलं होतं. तो नेहमीच तिथे परिवारासोबत सुट्टी एन्जॉय करण्यात जात होता. 29 मे रोजी तो इथेच होता. दुपारी समुद्र किनारी पोहोचून पॅडलबोर्डिंग करत होता आणि त्याची गर्लफ्रेंड त्याचा व्हिडीओ काढत होती. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकांनी सांगितलं की, वादळ येण्याचा अंदाज लागताच तिने खूपदा स्कॉटला बाहेर येण्यास सांगितलं होतं. अचानक दुपारी दीड वाजता स्कॉटवर वीज पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

स्कॉटसोबत तिथे असलेल्या वॅंडर मचाडो यांनी सांगितलं की, जेव्हा ते स्कॉटजवळ पोहोचले तेव्हा त्याचा चेहरा निळा पडला होता. कसेतरी ते त्याला किनाऱ्यावर खेचत घेऊन आले. फर्स्टएड दिल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तेव्हा त्याला मृत घोषित केलं गेले. स्कॉटच्या परिवारानुसार, तो फारच दिलखुलास आणि मनमौजी माणूस होता. त्याच्या जाण्याने परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

टॅग्स :LondonलंडनJara hatkeजरा हटके