शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

11 मुलांचा पिता आणि 40 नातवंडांच्या आजोबांनी केलं पाचवं लग्न; मुलींनीच थाटून दिला संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 4:46 PM

"मला लग्न करायचं नव्हतं; पण दोन मुलींच्या हट्टापुढे मी हार मानली. माझ्या आठ मुलींची लग्नं झाली आहेत. घरात दोनच मुली राहिल्या होत्या."

लग्न म्हटलं की मजा, मस्ती, रुसवे-फुगवे असे भन्नाट किस्से हे आलेच. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. एका व्यक्तीने एक, दोन वेळा नव्हे तर पाच वेळा लग्न केलं आहे. सध्या या 56 वर्षीय व्यक्तीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून तो पाकिस्तानचा रहिवासी आहे. ही व्यक्ती 11 मुलांचा पिता असून त्याला 10 मुली आणि एक मुलगा आहे. त्यापैकी आठ मुलींचं लग्न झालं असून, मुलाचंही लग्न झालं आहे. त्याच्या कुटुंबात तब्बल 62 सदस्य आहेत. 

पाकिस्तान डेलीशी संवाद साधताना शौकत यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मला लग्न करायचं नव्हतं; पण दोन मुलींच्या हट्टापुढे मी हार मानली. माझ्या आठ मुलींची लग्नं झाली आहेत. घरात दोनच मुली राहिल्या होत्या. लग्नानंतर माझ्याबरोबर कोणी नसेल म्हणून मुली माझ्या पाचव्या लग्नाच्या मागे लागल्या. दोन्ही मुलींनी माझ्यासाठी मुलगी शोधली आणि त्यांच्या लग्नाच्याच दिवशी लग्न लावून दिलं."

शौकत यांच्या चारही पत्नींचं निधन झालंय. नव्या लग्नाबद्दल बोलताना शौकत सांगतात, 'आयुष्यात प्रत्येकाला प्रेम मिळत नाही आणि मला 5-5 वेळा मिळालं. मुलींची इच्छा होती, की मी पुन्हा लग्न करावं. कारण मलाही माझं आयुष्य जगायचं आहे. म्हणूनच मीही हो म्हणालो.' शौकत यांचं कुटुंब खूप मोठं आहे. त्यांना 40 नातवंडं आहेत. त्यांच्या संपूर्ण कुटुंबात एकूण 62 सदस्य आहेत आणि संपूर्ण कुटुंब एकत्र राहतं. 

शौकत यांच्या नव्या आणि पाचव्या पत्नीलाही एवढ्या मोठ्या एकत्र कुटुंबाची कोणतीही अडचण नाही. घरात एक वेळच्या जेवणासाठी संपूर्ण कुटुंबासाठी सुमारे 100 पोळ्या बनवल्या जातात. त्यांच्या बायकोलाही याचा काहीच त्रास नाही. 'ती म्हणते, मला मोठं कुटुंब आवडतं आणि मी हळूहळू या कुटुंबाशी पूर्णपणे जुळवून घेईन, असं शौकत यांनी सांगितलं.' शौकत यांच्या पाचव्या लग्नाची गोष्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके