पाकिस्तानातील गुजरांवाला येथील एका भिकाऱ्याच्या कुटुंबानं त्यांच्या आजीच्या मृत्यूच्या 40 व्या दिवशी 20,000 लोकांसाठी एका मोठ्या मेजवानीचं आयोजन केलं होतं. यामध्ये संपूर्ण पंजाबमधील लोक उपस्थित होते. यामध्ये लोकांना वाढण्यात आलेल्या पदार्थांबद्दल जाणून घेतल्यावर तुम्ही थक्कच व्हाल. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे, ज्याला पाहून लोकही त्या व्यक्तीकडे एवढे पैसे कुठून आले या विचारात पडलेत.
पाकिस्तानातून एक विचित्र घटना समोर आली आहे. हा घटना ऐकून अने अनेक लखपती-करोडपतींना धक्का बसेल. येथील गुजरनवालामधील एका भिकाऱ्याने 20,000 लोकांसाठी शाही मेजवानी आयोजित केली. शिवाय, पाहुण्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यासाठी सुमारे 2,000 वाहनांची व्यवस्थाही केली.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, भिकारी आणि त्याच्या कुटुंबाने या कार्यक्रमावर सुमारे 1.25 कोटी पाकिस्तानी रुपये (भारतीय चलनात सुमारे 38 लाख रुपये) खर्च केले. एका भिकाऱ्याने हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच्याकडे इतके पैसे कुठून आले, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, या घटनेची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
शाही मेजवानी, 250 बकऱ्यांचा बळीमीडिया रिपोर्ट्सनुसार, भिकारी कुटुंबाने त्यांच्या आजीच्या मृत्यूच्या 40 व्या दिवशी गुजरनवाला येथील राहवली रेल्वे स्टेशनजवळ ही भव्य मेजवानी आयोजित केली होती, ज्यामध्ये पंजाबमधील हजारो लोक उपस्थित होते. जेवणात पाहुण्यांसाठी मटण, नान मटर गंज (गोड भात) व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या मिठाईची व्यवस्था करण्यात आली होती. येणाऱ्या पाहुण्यांची संख्या लक्षात घेऊन कुटुंबाने 250 बकऱ्यांचा बळी दिला होता. या भव्य मेजवानीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.