एका पाकिस्तानी कपल साधारण ७० दिवसांपासून अटारी बॉर्डरवर अडकून होतं. यादरम्यान दोन डिसेंबरला त्यांनी त्यांच्या परिवारात एका तान्हुल्याचं स्वागत केलं. त्यांनी या बाळाचं नाव बॉर्डर ठेवलं. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, डिलीव्हरी भारत-पाकिस्तान बॉर्डरवर झाली होती. त्यामुळे कपलने त्यांच्या बाळाचं नाव बॉर्डर ठेवलं.
पंजाब प्रांतातील राजनपूर जिल्ह्यात राहणारा निंबू बाई आणि बलम राम हे इतर ९७ पाकिस्तानी नागरिकांसोबत अटारी बॉर्डरवर राहत आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, जेव्हा २ डिसेंबरला निंबू बाईला प्रसव वेदना झाल्या तर पंजाबमधील काही महिला तिची प्रसूतीत मदत करण्यासाठी बॉर्डरवर पोहोचल्या होत्या. इतर सेवेंसोबत स्थानिक लोकांनी आई आणि नवजात बाळासाठी मेडिकल सुविधांचीही व्यवस्था केली.
पती म्हणाला की, तो आणि पाकिस्तानातील इतर नागरिक आवश्यक कागदपत्रे कमी असल्याने भारताच्या तीर्थ यात्रेनंतर घरी परतू शकत नाहीत. ९७ नागरिकांपैकी ४७ लहान मुले आहेत. त्यातील सहा भारतात जन्माला आले होते आणि १ वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत.
लहान मुलाच्या नावाची आणखी एक इंटरेस्टींग कहाणी आहे. एका महिलेने तिच्या मुलाचं नाव एक प्रसिद्ध डुकराच्या नावावर ठेवलं होतं. नंतर तिने ते बदलण्यास नकार दिला. महिलेने ई.बी व्हाइट यांची प्रसिद्ध कादंबरी 'चार्लोट्स वेब' वाचली होती. व्हाइटने बेबी १ साठी ओलिवर ली आणि बेबी २ साठी विलबर फेलिक्स नाव ठरवलं होतं. विल्बर फेलिक्स हा प्रसिद्ध कादंबरीतील डुक्कर आहे. ती या नावावर अडून बसली.
तसेच गेल्यावर्षी अलास्कामध्ये एका आईने तिच्या बाळाला विमानात जन्म दिल्यावर त्याचं नाव स्काय ठेवलं होतं. आणखी पाकिस्तानी नागरिक ज्याचं नाव लग्य राम आहे. त्याने त्याच्या मुलाचं नाव भारत ठेवलं आहे. कारण त्याचा जन्म २०२० मध्ये जोधपूरमध्ये झाला होता. बाळाची डिलेव्हरी झाली तेव्हा लग्या आपल्या भावाला भेटण्यासाठी जोधपूरला आला होता. पण काही दिवस तो पाकिस्तानात पुन्हा प्रवेश करू शकला नाही.