जगभरात असे अनेक रहस्य आहेत, जे लोकांना चक्रावून सोडतात. एक असंच रहस्य तुर्कीतील पमुक्कलेच्या डोंगरांमध्ये आहे. इथे काही नैसर्गिक स्वीमिंग पूल तयार झाल आहेत. जे बघायला सुंदर तर आहेत, पण सोबतच लोकांच्या चर्चेचा विषयही ठरत आहेत. कारण या झऱ्यांमधील पाणी आपोआप गरम होतं. आश्चर्याची बाब म्हणजे ही बाब वैज्ञानिकांसाठीही रहस्य बनली आहे.
असे मानले जाते की, इथे गरम पाण्याचं हे सरोवररूपी झरे हजारो वर्षांपासून आहेत. इथे पाण्याचं तापमान ३७ डिग्री ते १०० डिग्री दरम्यान राहतं. असेही म्हणतात की, स्वीमिंग पूलप्रमाणे असलेल्या या झऱ्यांमधील पाण्यात आंघोळ केल्याने अनेक आजार दूर होतात. खासकरून त्वचेसंबंधी आजार लगेच दूर होतात. याच कारणाने हे गरम पाण्याचे झरे बघण्यासाठी जगभरातून लोक इथे गर्दी करतात.
येथील सर्वात आश्चर्यजनक बाब म्हणजे हे गरम पाण्याचे सरोवर आपोआप तयार झालेत की, ते तयार करण्यात आलेत याबाबत कुणालाच काही माहिती नाही. पण दिसायला तर हे कुणीतरी तयार केल्यासारखे वाटतात.
या सरोवरातील पाण्यावर वैज्ञानिकांनी अनेक रिसर्च केले. त्यानुसार, येथील पाण्यातील खनिजं बाहेरील हवेच्या संपर्कात आल्यावर कॅल्शिअम कार्बोनेट तयार होतं. जे हजारो वर्षांपासून या सरोवराच्या किनाऱ्यावर जमा होत आहे. हेच कारण आहे की, या झऱ्यांनी आता सरोवराचं रूप घेतलं आहे.