तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल की, कधी एक मशीन तुम्हाला पाणीपुऱी खाऊ घालेल. पण असं झालं आहे. पाणीपुरी देणाऱ्या एका मशीनचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. अनेकांकडून या आविष्काराचं कौतुक केलं जात आहे. कारण कोरोना काळात कुणाच्या संपर्कात न येताही तुम्ही पाणीपुरीचा आनंद घेऊ शकता.
सध्या कोरोनामुळे लोकांना त्यांच्या आवडत्या पदार्थांसोबतच पाणीपुरीलाही मुकावे लागत आहे. बाहेर दुकान लागत असले तरी कुणाच्यातरी संपर्कात यावं लागतं. जे सध्या परवडणारं नाही. अशात हे पाणीपुरीचं एटीएम मशीन पाणीपुरी चाहत्यांसाठी वरदानच ठरणार, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
एका ट्विटर यूजरने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, पाणीपुरी एटीएम मशीन आज बाजारात लॉन्च होत आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती मशीनबाबतची माहिती देत आहे. तो सांगतोय की, 'ही पाणीपुरी मशीन एटीएमसारखं काम करते. ही तयार करायला फक्त सहा महिन्यांचा कालावधी लागलाय'. त्यानंतर या व्यक्तीने ही मशीन वापरण्याची पद्धत सांगितली आहे.
खरंच ही मशीन आली तर कुणाच्या संपर्कात न येता तुम्ही पाणीपुरी खाऊ शकता. पण एक प्रॉब्लेम आहे की, तुम्ही एक्स्ट्रा पाणी आणि पापडी मागू शकत नाही.
बाबो! कोलकाता ते लंडनपर्यंत चालत होती 'ही' बस, 45 दिवसात पूर्ण होत होता प्रवास...