आॅस्ट्रियातील हा पार्क जगात अतिशय वेगळा आहे. वर्षातील ११ महिने येथे लोक फिरायला व खेळायला येतात व एक महिना हा पार्क पूर्णपणे बुडून जातो, मग येथे लोक फिरायला न येता स्कुबा डायव्हिंगसाठी येतात. आॅस्ट्रियातील ट्रेगोसमधील हा पार्क ‘ग्रीन लेक’ नावाने प्रसिद्ध आहे. पार्कच्या किनाऱ्याला मोठा तलाव आहे. उन्हाळ्यात पहाडांवरील बर्फ वितळून या तलावातील पाण्यात वाढ होते. त्यामुळे त्या शेजारचा पार्क बुडून जातो. वर्षभर पार्कमध्ये फिरायला येणारे महिनाभर पोहण्याचा आनंद लुटतात. हा पार्कदेखील इतर मैदानासारखाच आहे, तेथे किती तरी झाडे-झुडपे, लाकडी बाके व रस्ते तयार झालेले आहेत. पाण्यात बुडाल्यानंतर आत जाऊन बघितल्यानंतर ते दृश्य एखाद्या कलाकृतीसारखे असते.
फिरायला आणि पोहायला देणारा आॅस्ट्रियातील पार्क
By admin | Published: June 01, 2017 12:53 AM