भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून मुलींना त्यांचा आवडता जोडीदार निवडण्याची परंपरा (Indian tradition) आहे. यासाठी पूर्वी स्वयंवर करण्यात यायचं, ज्यामध्ये मुलगी आपल्या आवडीच्या वराची निवड करायची. अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक ग्रंथांमध्ये स्वयंवराचा उल्लेख आढळतो. काळानुसार समाजात बदल झाला, त्यामुळे सर्वसामान्यांच्या राहणीमानातही बदल झाला. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अशा प्रथा आजही भारतीय समाजात वेगळ्या स्वरूपात जिवंत आहेत, ज्यात तरुण पुरुष आणि स्त्रिया स्वत:च्या इच्छेने जीवनसाथी निवडतात. याचीच झलक बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात पाहायला मिळते. दरवर्षी इथे एक मेळा भरतो, ज्यामध्ये मुली त्यांच्या पसंतीचा नवरदेव निवडतात. पत्ता (Patta Mela) मेळा असं या मेळ्याचं नाव आहे.
]बर्याच दिवसांपासून पूर्णियाच्या बनमंखी येथील माळीणीया गावात अशी जत्रा भरते, जिथे मुलं आणि मुली त्यांच्या आवडीनुसार जोडीदार निवडतात. मुलीने पान खाल्लं तर नातं पक्कं झालं असं समजलं जातं. पत्ता जत्रा असं या जत्रेचं नाव आहे. माळीणीया गावात भरणारा हा आदिवासी समाजाचा खास मेळा आहे. आदिवासी तरुण-तरुणी येथे दूरदूरवरून येतात आणि या जत्रेत आपल्या आवडीचा मुलगा व मुलगी निवडतात.
मुलाला एखादी मुलगी आवडत असेल तर तो तिला पान खाण्यासाठी प्रपोज करतो. जर मुलीने पान खाल्लं तर ती तिची संमती मानली जाते. यानंतर मुलगा त्या मुलीला सर्वांच्या संमतीने आपल्या घरी घेऊन जातो, जिथे ते काही दिवस एकत्र घालवतात. या दरम्यान मुलगा आणि मुलगी एकमेकांना समजून घेतात. त्यानंतर दोघेही लग्नाच्या बंधनात बांधले जातात. यानंतर दोघांपैकी कोणीही लग्नास नकार दिल्यास आदिवासी समाजातील लोक त्यांना कठोर शिक्षा देतात आणि दंडही वसूल करतात.
या मेळाव्यात बांबूचा खास टॉवर बसवण्यात आला आहे. त्यावर चढून एक विशेष प्रकारची पूजा केली जाते. याशिवाय या मेळाव्यात आदिवासी तरुण-तरुणी ढोल-ताशांच्या तालावर नाचतात. एकमेकांवर माती टाकून आनंद साजरा करतात. या जत्रेत नेपाळमधूनही लोक येतात.
बैसाखी आणि शिरवा उत्सवानिमित्त दोन दिवस ही जत्रा भरते. ही जत्रा परिसरात खूप लोकप्रिय आहे. असं म्हटलं जातं की ज्या काळात हिंदू समाजात पर्दा पद्धत प्रचलित होती. लोक मुलींना बाहेर पडू द्यायचे नाहीत, तेव्हापासून आदिवासी समाजात मोकळेपणा आणि स्वातंत्र्य होतं. मुलींना स्वतःच्या मनाप्रमाणे नवरा निवडण्याचा अधिकार होता. आजही हा पत्ता मेळा भरतो, ज्यात मनं जुळतात आणि ती नात्यात बदलतात.