सामान्यपणे डासांपासून सगळेच लोक हैराण असतात. खासकरून उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात डासांची समस्या अधिक वाढते. डासांमुळे रात्री झोपेचं खोबरं होतं. पण तुम्ही कधी विचारही केला नसेल की, डास कधी खाल्ले जाऊ शकतात. एक असा देश आहे जिथे लोक डास आवडीने खातात. कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही किंवा किळसवाणं वाटू शकतं. पण हे सत्य आहे. येथील लोक डासांच्या वड्या बनवून खातात. त्याचं कारणही खास आहे.
एका दिवसात 10 लाख डास खातो एक व्यक्ती
हा एक आफ्रिकन देश आहे. इथे लोक एका दिवसात सहजपणे एका लाख डास सहजपणे खातात. पावसाळ्यात व्हिक्टोरिया झीलमध्ये डासांची संख्या वाढते. जी येथील लोकांसाठी आनंदाची बाब असते. या काळात हे लोक जास्तीत जास्त डास पकडतात आणि त्यांच्या वड्या बनवून खातात.
काय आहे कारण?
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, इथे लोक आपली बॉडी बनवण्यासाठी डास खातात. येथील लोकांमध्ये असा समज आहे की, डास खाल्ल्याने त्यांची बॉडी बनते. याच कारणाने जास्तीत जास्त लोक डास पकडून त्यांना आवडीने खातात.
कसे खातात डास?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत सांगण्यात आलं होतं की, हे लोक डासांना वेगवेगळ्या भांड्यांमध्ये पकडतात. नंतर त्यांनी हलकं बारीक करून त्यांच्या वड्या बनवतात. एक वडी साधारण 5 लाख डासांपासून तयार होते. इथे एक व्यक्ती दोन वड्या खातात. अशाप्रकारे एका दिवसात ते दोन वड्या खातात.
डासांमध्ये काय असतं?
आफ्रिकेतील लोकांचं मत आहे की, डासांमध्ये हाय प्रोटीन असतं. अशात त्यांनी डास खाल्ले तर त्यांची बॉडी चांगली बनते. सोशल मीडियावर यासंबंधी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.