शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

फुकटच्या जेवणासाठी कायदेशीररित्या कायमचे बदलले नाव, आता पश्चातापाची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 4:26 PM

तैवानमध्ये मोफत अन्न मिळवण्यासाठी शेकडो लोकांनी कायदेशीररित्या आपली नावं बदलली आहेत.

तैवानमध्ये एक खास डिश आहे - सुशी. ही डिश लोकांना इतकी आवडते, की त्यासाठी ते काहीही करू शकतात. होय, इथे जर कोणी लोकांना मोफत सुशी खायला देण्याऐवजी त्यांचं नाव बदलण्यास सांगितलं, तर लोक तेही करतात. आम्ही आज हे सांगत आहोत कारण तैवानमध्ये मोफत अन्न मिळवण्यासाठी शेकडो लोकांनी कायदेशीररित्या आपली नावं बदलली आहेत (People Changed Names for Free Food).

ही विचित्र घटना मार्च २०२१ मध्ये तैवानमध्ये घडली होती, जी जगभरात चर्चेत होती. येथील सुशिरो या प्रसिद्ध रेस्टॉरंट चेनने लोकांना ऑफर दिली होती की, जर त्यांना मोफत जेवण हवं असेल किंवा त्यात मोठी सूट हवी असेल तर त्यांना कायदेशीररित्या आपलं नाव बदलून सॅल्मनशी मिळतं-जुळतं ठेवावं लागेल. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे लोकांनी यासाठी आपली नावंही बदलली.

Salmon ची ही गोष्ट इतर देशांमध्येही खूप गाजली. लोकप्रिय सुशी रेस्टॉरंट चेन सुशिरोने ऑफर केली की ज्यांच्या नावामध्ये Salmon असेल त्यांना कमी किमतीत किंवा मोफत सुशी खायला मिळेल. त्याच्यासोबत आणखी ५ लोक मोफत जेवण घेऊ शकत होते. लोकांनी या ऑफरचा फायदा घेतला आणि Household Registration Offices ने सांगितल्यानंतरही सुमारे ३३० लोकांनी कायदेशीररित्या आपली नावं बदलली. रेस्टॉरंटची जाहिरात इतकी लोकप्रिय झाली की यामुळे तैवानच्या राजकारणातही पेच निर्माण झाला.

त्या काळी फुकटच्या जेवणाच्या ऑफरसाठी लोकांनी Salmon वरुन स्वतःला अजब नावं दिलं. काही लोकांची नावं कायदेशीररित्या बदलली गेली, परंतु काही लोक त्याच विचित्र नावात अडकले आहेत. तैवानच्या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला तीन वेळा नाव बदलण्याचा अधिकार आहे. ज्यांनी पहिल्यांदाच आपलं नाव बदललं होतं, त्यांनी पुन्हा आपलं जुनं नाव परत ठेवलं, परंतु काही लोकांना हे माहिती नव्हतं की त्यांचं नाव लहानपणीच दोनदा बदललं गेलं आहे आणि आता ते पुन्हा नाव बदलू शकत नाहीत. आजही ते डान्सिंग सॅल्मन, लाफिंग सॅल्मन अशी नावं घेऊन फिरतायेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके