अंधश्रद्धेचा कहर! कोरड्या नदीत खड्डा केल्यास लागलं पाणी, कोरोनाचं औषध समजून पिऊ लागले लोक....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 04:50 PM2021-05-06T16:50:58+5:302021-05-06T17:07:31+5:30
Coronavirus News : कोरड्या नदीत जर खड्डा केला तर त्यात पाणी लागतं. यादरम्यान गावात अफवा पसरली की, हे चमत्कारी पाणी आहे आणि हे पाणी प्यायल्याने कोरोना आजार ठीक होतो.
(Image Credit : TV9 Hindi)
कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात थैमान घातलं आहे. अशात लोक यावरील उपचार शोधत आहेत. कारण अजूनही यावर ठोस असं औषध सापडलेलं नाही. अशात कुणी काढ्याचा देशी उपाय करत आहे तर कुठे औषधांवर लोकांची नजर आहे. अशात मध्य प्रदेशच्या गुनामध्ये काही लोकांनी कोरड्या पडलेल्या नदीत खड्डे केले आणि त्यातून निघालेलं पाणी कोरोनावरील औषध समजून प्यायले.
ही घटना आहे गुनाच्या बमोरी ब्लॉकमधील. जोहरी गावातून बरनी नदी वाहते. पण दोन तीन महिन्यांपासून नदी कोरडी पडली आहे. मात्र, कोरड्या नदीत जर खड्डा केला तर त्यात पाणी लागतं. यादरम्यान गावात अफवा पसरली की, हे चमत्कारी पाणी आहे आणि हे पाणी प्यायल्याने कोरोना आजार ठीक होतो. अफवा पसरता गावातील लोकांनी नदीवर एकच गर्दी केली आणि तिथे खड्डे करू लागले.
नदीत आधीच काही खड्ड्यांमध्ये पाणी भरलेलं आहे. काही लोक या खड्ड्यातील पाणी पित होते. या खड्ड्यांमध्ये घाणेरडं पाणी आहे. जे पिऊन आजरांचा धोका वाढू शकतो. मात्र, अंधविश्वसामुळे लोक हे पाणी उपचार समजून पित आहेत. स्थानिक प्रशासनाने लोकांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण लोक काही एक ऐकायला तयार नाही.
घाणेरडं पाणी पिणाऱ्या गावातील लोकांना अधिकाऱ्यांनी समजावले की, कुणीतरी नदीत खड्डा केला असेल आणि पाणी लागल्यावर अफवा पसरली. यात चमत्कारासारखं काहीच नाही. हा अंधविश्वास आहे. पण गावातील लोकांनी अधिकाऱ्यांचं काही ऐकलं नाही. ते नदीतील खड्ड्यातील पाणी पित राहिले.
ही नदी जंगलाच्या आत आहे आणि ज्या ठिकाणी पाणी निघत आहे ते ठिकाण नदीत फार आत आहे. त्यामुळे तिथे पाणी लागणं काही यात काही चमत्कार नाही. मात्र, तरीही लोक या अफवेवर विश्वास ठेवून पाणी पित आहेत. तर काही लोक पूजा करून धान्यही अर्पण करत आहेत.