नवी दिल्ली - आपण सुंदर दिसावं यासाठी काही जण वाटेल ते करतात. यासाठी मेकअपशिवाय कॉस्मेटिक सर्जरीचाही पर्याय उपलब्ध झाला आहे. सुंदर दिसण्याच्या नादात केलेला भलताच प्रयोग अनेकदा अंगाशी येतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. छान दिसण्याच्या नादात तरुणीने इंजेक्शन घेतलं पण त्याचा विपरित परिणाम झाला आहे. एका सुईमुळे तरुणीच्या ओठांची भयंकर अवस्था झाली आहे. तिने आपल्या बॉयफ्रेंडला सरप्राईझ देण्याचा प्लॅन केला होता. पण तरुणीने चेहऱ्यावरचा मास्क काढताच बॉयफ्रेंड हादरला आणि त्याला 440 व्होल्टचा झटकाच बसल्याची घटना घडली आहे.
25 वर्षीय क्लिओ सिम्स (Cleo Symes) ने एक कॉस्मेटिक ट्रिटमेंट करून घेतली. ज्यामुळे तिला खूप काही सहन करावं लागला आहे. क्लिओने ओठ अधिक सुंदर बनवण्यासाठी ट्रिटमेंट केली होती. ती बरी करण्याच्या नादात तिची अवस्था आणखी भयंकर झाली. तिला तिच्या ओठांचा आकार लहान वाटला. त्यामुळे तिने ओठांवर फिलर इंजेक्शन घेऊन त्यांचा आकार बदलला. पण त्यानंतर त्याचा जो परिणाम समोर आला तो पाहून ती स्वतःही घाबरली. तिचा चेहरा पाहून तिचे मित्रमैत्रिणी हसू लागले. आता तिला आपला आधीचा चेहरा पुन्हा हवा आहे. यासाठी तिने लिप फिलर डिझॉल्व्ह करायला सुरुवात केली.
क्लिओवर भयंकर परिणाम झाला की तिचे ओठ फुग्यासारखे फुगले
क्लिओवर इतका भयंकर परिणाम झाला की तिचे ओठ फुग्यासारखे फुगले. तिचा चेहरा माकडासारखा वाटू लागला. क्लिओ याच दरम्यान आपल्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली होती. कोरोनाच्या काळात मास्क घालणं बंधनकारक आहेच. क्लिओने आपल्या चेहऱ्यावरील मास्क हटवला. बॉयफ्रेंडने तिचा चेहरा पाहिला तेव्हा त्याला आधी धक्का बसला पण नंतर हसूही आवरलं नाही. फिलर डिझॉल्व्ह केल्यानंतर तिने आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. जे पाहून नेटिझन्स शॉक झाले आहेत.
बॉयफ्रेंडला सरप्राईझ देण्याचा प्लॅन पण...
लिप फिलर डिझॉल्व्ह केल्यानंतर तिने आपल्या बॉयफ्रेंडला सरप्राईझ देण्याचा प्लॅन केला. त्याच्यासोबत ती आधी मास्क घालून फिरायला गेली. जसं तिने आपला मास्क हटवला तसे तिचे ओठ पाहून तो शॉक झाला. पण क्लिओ खचली नाही. तिने आपले ओठ पूर्वीसारखे होण्यासाठी पाहिली. हळूहळू तिचे ओठ आधीसारखे सामान्य आकारात आले, तेव्हा कुठे तिला दिलासा मिळाला. ओठ सामान्य झाल्यानंतर तिने आपला व्हिडीओ शेअर केला. तसंच इतर युजर्सनाही असे काही उपचार करू नका म्हणून सल्ला दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.