भोसे (ता. खेड) येथील गांडेकर वस्तीवरील अमृत गांडेकर यांच्या शेतातील बारमाही (वर्षातून दोन वेळा) कैऱ्यांनी लगडलेले आंब्याचे झाड परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे. आकाराने गोल व रंगाने पोपटी असणाऱ्या या आंब्याच्या झाडाची ‘जात’ माहिती नसल्याचेही गांडेकर यांनी सांगितले.साधारण आठ वर्षांपूर्वी देहू येथील नर्सरीतून आणलेले आंब्याचे रोप गांडेकर यांनी लावले. दुसऱ्याच वर्षीपासून झाडाला कैऱ्या येण्यास सुरुवात झाली. गेल्या सात वर्षांपासून झाडाला कैऱ्या येत आहेत. सध्याही या झाडावर जवळपास अडीचशे ते तीनशे कैऱ्या आहेत. आणखी महिनाभराने आंबे पिकण्यास सुरुवात होईल.
बारमाही कैऱ्या देणारे झाड
By admin | Published: August 21, 2015 2:42 AM