Permission Certificate To Indian : सध्या सोशल मीडियावर जुने बिलं आणि सर्टिफिकेट व्हायरल होत आहेत. कधी सोने खरेदीचं बिल तर कधी पाकिस्तानचं रेल्वे तिकीट व्हायरल होत आहे. म्हणजे 60-70 वर्षाआधी कशाची किती किंमत होती हे यातून समोर येत आहे. असंच एक सर्टिफिकेट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जे इंग्रजांच्या काळातील आहे.
हे काही असं सर्टिफिकेट नाहीये जे एखाद्याला त्याच्या खास कामासाठी दिलं जात होतं. हे सर्टिफिकेट इंग्रजांनी भारतीयांवर केलेल्या अत्याचाराचं उदाहरण आहे. हे सर्टिफिकेट पाहून वाटत आहे की, त्या काळात इंग्रज अधिकाऱ्यांसमोर बसण्यासाठी भारतीयांना परवानगी घ्यावी लागत होती. हे सर्टिफिकेट त्याचंच एक प्रमाण आहे.
सोशल मीडियावर अनेक लोकांनी हा फोटो शेअर केला आहे. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्टिफिकेट गेल्यावर्षी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ़चे नेते राजा भैया यांनी शेअर केलं होतं. जे पुन्हा एकदा शेअर होत आहे. यावर 1887 हे वर्ष लिहिलं आहे. हे सर्टिफिकेट त्या व्यक्तीला देण्यात आलं होतं ज्याने इंग्रज अधिकाऱ्याला भेटण्याची आणि त्याच्यासमोर बसण्याची परवानगी मागितली होती.
1887 च्या जुलैमध्ये दिल्ली जिल्ह्यातून हे सर्टिफिकेट राम नरसिमसाठी जारी करण्यात आलं होतं. डेप्युटी कमिश्नरने हे सर्टिफिकेट जारी केलं होतं आणि त्यावर मोहरही लावली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वातंत्र्याआधी भारतीयांना ब्रिटिश अधिकाऱ्याची प्रतीक्षा करण्यासाठी खुर्चीवर बसण्याची परवानगी नव्हती. त्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल तरच त्यांना परवानगी होती.