आकाशातून जमिनीवर पडणाऱ्या उल्कापिंडाला एकत्रिक करून एक व्यक्ती कोट्यवधींची कमाई करत आहे, ४८ वर्षाच्या या व्यक्तीचं नाव माइक फार्मर आहे, अमेरिकेतील एरिजोना येथे राहणारा माइक जगभरात उल्कापिंड डीलरच्या रुपाने प्रसिद्ध आहे. द सन रिपोर्टनुसार माइक फार्मर उल्कापिंड एस्ट्रोनॉमर्सपासून श्रीमंत लोकांना विकत देण्याचं काम करतो. परंतु उल्कापिंड जमा करणं इतकं सोप्पं काम नाही.
अनेकदा उल्कापिंडाच्या शोधासाठी माइक फार्मरला जीव धोक्यातही घालावा लागला आहे. उल्कापिंडच्या शोधात त्यांना करावा लागलेल्या धोक्याबद्दल माइक सांगतात की, मला साहस करायला आवडतं, ते काम करताना मला आनंद होतो. माइक यांना उल्कापिंडाच्या शोधात जंगल आणि निर्जनस्थळी जावं लागतं, उल्कापिंडाचा शोध घेण्यासाठी त्यांना अनेकदा कठोर मेहनत घ्यावी लागते, जेणेकरून याचा अंदाज येऊ शकतो की, उल्कापिंड कोणत्या जागी पडणार आहे किंवा यापूवी कुठे पडला असावा.
माइक फार्मर उल्कापिंडाची खरेदी-विक्रीही करतात आणि उचित बोली मिळाल्यानंतर ते विक्री करतात. त्यांनी सांगितले की, शिक्षणासाठी कर्ज घेऊन मी पहिल्यांदा १९९५ मध्ये उल्कापिंडाचे काही दगड खरेदी केले होते. यावेळी माइक फार्मरने मोरक्कोचा दौरा केला होता, त्याठिकाणी एक मोठा मून रॉक खरेदी केला होता. पण ज्यावेळी तो खरेदी केला, तेव्हा त्या दगडाचं महत्त्व त्यांनाही माहिती नव्हतं, त्यानंतर मून रॉक(Lunar Meteorite) जवळपास ७ कोटी ३२ लाखांमध्ये विकला होता. या पैशातून त्यांनी कर्ज फेडून आणि एक घर खरेदी करण्यास यशस्वी झाले, यानंतर त्यांनी त्यांच्या व्यवसायात मागे वळून कधीच पाहिले नाही.