ऑस्ट्रेलियातील एका व्यक्ती रातोरात करोडपती बनला आहे. या व्यक्तीला कोट्यवधीची लॉटरी लागली होती. परंतु यातील एकाही पैशाचा वापर त्या व्यक्तीने केला नाही. तर त्याने असं काही काम केले त्यामुळे सगळेच हैराण झाले. नेमकं हा अचानक कोट्यधीश कसा बनसा आणि काय काम केले हे जाणून घेऊया.
मिरर यूकेच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियन व्यक्ती पीटर चार्लटन(Peter Charleton) ने टैट्स लोट्टोची लॉटरी जिंकली. या लॉटरीत व्यक्तीनं ५ कोटींचे बक्षीस रक्कम म्हणून मिळाली. इतकी मोठी रक्कम हातात आल्यानंतर चार्लटनचं मन बदललं. इतकी मोठी रक्कम ठेवायची त्याची इच्छा झाली नाही. चार्लटनने ही रक्कम आर्थिक आणि गरिबीशी संघर्ष करणाऱ्यांना दान करण्याचं ठरवलं. लॉटरी विजेत्या पीटर चार्लटन यांनी ५ कोटींची रक्कम लॉकडाऊन वेळी जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या त्याच्या मित्रांना आणि काही अनोळखी लोकांना दिली.
चार्लटन म्हणाला की, मला लॉटरी लागली असून ५ कोटी जिंकलेत. हे लोकांना समजण्यापूर्वी हे पैसे दान केले कारण मला या पैशापासून सुटका हवी होती हाच उद्देश होता. माई बिग स्टोरी नावाच्या एका यूट्यूब चॅनेलमध्ये पीटरनं हा खुलासा केला आहे. दिवंगत काकाच्या आठवणीत पीटरनं लॉटरीची ३ तिकिटे खरेदी केली होती. लॉटरी लागल्यानंतर त्याने मित्र, कुटुंबातील सदस्य आणि काही अनोळखी लोकांना ही रक्कम पोहचवली. ही रक्कम प्रत्येकाच्या बँक खात्यात पाठवली. सुरुवातीला ज्यांच्या खात्यात एवढी रक्कम आली ते पाहून ते हैराण झाले. त्यानंतर एक एक करून पीटर चार्लटनने सर्व रक्कम दुसऱ्यांना दिली आणि तो पुन्हा पूर्वीप्रमाणे आयुष्य जगू लागला. तसेच मी सगळ्यांना रक्कम दिल्यानंतर माझ्या मनाला शांती लाभली. मी लॉटरीचं तिकीट खरेदी केले आणि जिंकले हे लोकांना कळण्यापूर्वी मला जिंकलेल्या पैशापासून सुटका हवी होती. ते मी केले असं पीटर चार्लटन यांनी सांगितले. पीटर चार्लटन यांनी केलेल्या या कामामुळे ज्यांच्या खात्यात रक्कम मिळाली ते खूप आनंदी आहेत. ते चार्लटन यांच्या निर्णयाचं कौतुक करत त्यांचे धन्यवाद मानत आहेत.