लोक तरूण असले की, त्यांना वाटत असतं की, त्यांची एखादी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असावा. जेणेकरून त्यांना जीवनाच आनंद घेता यावा. पण कधी असं ऐकलंय का की, एखादी व्यक्ती प्रेमासाठी इतकी उत्सुक असते की, एका मृतदेहासोबत प्रेम करेल? अशा व्यक्तीबाबत तुम्ही ऐकलं नसेल, पण पेरूमध्ये अशा एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, 26 वर्षीय जूलियो सीझर बर्मेजो (Julio Cesar Bermejo) पेरूचा एक डिलेव्हर ड्रायव्हर आहे. ज्याला नुकतीच एका ममीसोबत अटक करण्यात आली आहे. चौकशीतून समोर आलं की, या व्यक्तीने ममीचं नाव Juanita ठेवलं होतं आणि तो तिला आपली आध्यात्मिक गर्लफ्रेंड मानत होता.
इतकंच नाही तर तो ममीला सोबत घेऊन बेडवर झोपत होता. तुम्ही वाचून थक्क व्हाल की, ही ममी 800 वर्ष जुनी होती. पोलिसांनी 25 फेब्रुवारीला जुलियोला अटक केली आहे. तिथे तो आपल्या मित्रांसोबत दारू पित होता. सोबत तो मृतदेहही घेऊन आला होता, जो त्याने मित्रांना दाखवला.
जूलियाने या गोष्टीचा विरोध केला की, तो मृतदेह विकणार होता. पोलिसांनी ममी ताब्यात घेतला आणि मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या ताब्यात दिला. जेलियोने सांगितलं की, त्याच्या वडिलांनी त्याला ही ममी दिली होती. जी त्यांच्या परिवारात 30 वर्षांपासून होती. पण वडिलांकडे ती कुठून आली याची माहिती पोलिसांना नाही. पोलिसांनी जूलियो आणि त्याच्या मित्रांना अटक केली आहे.
ज्या ममीला महिलेचा मृतदेह समजून जूलियोने आपली गर्लफ्रेंड बनवलं होतं, तो मृतदेह पुरूषाचा निघाला. चौकशीतून समोर आलं की, हा मृतदेह एका 45 वर्षीय पुरूषाचा होता जो 600 ते 800 वर्षाआधी मरण पावला होता.