तुम्ही घरात कुत्रा, मांजर, पक्षी पाळल्याने नेहमी बघत असाल. पण कधी वाघ आणि सिंह पाळल्याचं ऐकलं किंवा पाहिलं का? नाही ना? पण चेक रिपब्लिकच्या मायकल प्रासेकने प्रशासन आणि शेजाऱ्यांच्या विरोधानंतरही दोन वाघ पाळले होते. त्याने चुकूनही असा विचार केला नसेल की, ज्या वाघांना तो पाळतो आहे तेच एक दिवस त्याचा जीव घेतील. रिपोर्ट्सनुसार, ३३ वर्षीय मायकलने Zdechov गावातील त्याच्या घराच्या मागच्या बाजूला या वाघांना ठेवले होते. इथे मंगळवारी त्याचा मृतदेह आढळला.
रिपोर्ट्नुसार, मायकलचा मृतदेह हा वाघाच्या पिंजऱ्यात मिळाली. पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, मायकलचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी वाघांना शूट करणे गरजेचे होते. सद्या पोलिस प्रकरणाची चौकशी करत आहेत.
मायकलने त्याच्या घराच्या मागे एक वाघ आणि एक वाघीण पाळली होती. या दोघांना तो २०१६ मध्ये घेऊन आला होता. पण या वाघांना आणल्यावर शेजारी लोकांना त्याला विरोध केला होता. कारण त्यांना भिती होती की, हे वाघ त्यांना नुकसान पोहोचवू शकतात.
धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनाने देखील मायकलला हे जंगली प्राणी पाळण्याची परवानगी दिली नव्हती. सुरूवातीला प्रशासनाने त्याला पिंजरे तयार करण्याची परवानगी दिली नव्हती. नंतर त्याला अवैध प्रजननासाठी दंडही भरावा लागला होता. मात्र चेक रिपब्लिकमध्ये या वाघांना ठेवण्याचा दुसरा पर्याय नसल्याकारणाने आणि त्यांना कोणत्याही प्रकारची इजा केली नसल्याने पुरावे न मिळाल्याने मायकल या वाघांना पाळू शकला.
मायकल गेल्या उन्हाळ्यात वाघिणीला वॉकला घेऊन गेल्यावर चर्चेत आला होता. एखाद्या कुत्र्याला घेऊन जावे तसा तो वाघिणीला वॉकला घेऊन गेला होता. या वॉकदरम्यान एक सायकलस्वार वाघिणीला धडकला होता. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं होतं.