शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

पीटर मा म्हणतो, कुणीतरी (नक्की) आहे ‘तिथे’!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 9:10 AM

माणूस अनेक वर्षे धडपड करून चंद्रावर जाऊन आला. मग त्याने मंगळावर मानवविरहित यान पाठवलं.

एलियन्स किंवा परग्रहवासी म्हटलं की बहुतेक सगळ्या लोकांचे कान टवकारतात. एलियन्स हा विषय कायमच जगभरातल्या लोकांच्या जिव्हाळ्याचा आहे. इतक्या मोठ्या विश्वामध्ये फक्त पृथ्वीवरच प्राणिजीवन आहे का? किंवा केवळ पृथ्वीवरच माणूस आहे का? आपल्यासारखा अजून एखादा ग्रह या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात असू शकतो का? मानवी वस्ती निर्माण होण्यासाठी जी पर्यावरणीय स्थिती लागते ती इतर कुठे असेल का? जर का असेल तर माणूस तिथे जाऊ शकतो का? माणसाला सतत अस्वस्थ करणाऱ्या अशा प्रश्नांमधूनच चांद्रमोहिमा आणि मंगळयानं जन्माला आली.

माणूस अनेक वर्षे धडपड करून चंद्रावर जाऊन आला. मग त्याने मंगळावर मानवविरहित यान पाठवलं. या दोन्ही ठिकाणी गेलेल्या यानांनी तिथल्या भूभागाचा, वातावरणाचा, तिथल्या मातीचा अभ्यास केला. तिथे पाणी आहे का? असू शकतं का? तिथे निदान बर्फ आहे का? प्राणवायू आहे का? झाडं वाढू शकतात का? वाढवता येऊ शकतात का..? असे अनेक प्रश्न माणसाला चंद्र आणि मंगळाबद्दल पडतात; पण या सगळ्याच्या मुळाशी कायम एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे तिथे माणूस जगू शकतो का? तिथे भविष्यात मानवी वस्ती होऊ शकते का? 

आणि याही प्रश्नाच्या तळाशी लपलेला प्रश्न असा असतो की जर तिथे मानवी वस्ती होणं शक्य असेल तर तिथे आधीपासून मानवी वस्ती असेल का? तिथे वेगळ्या प्रकारचा माणूस असेल का? असेल तर त्याच्याशी आपण संपर्क साधू शकतो का? पृथ्वीवरचा मानव एकटाच आहे की त्याचे इतर कोणी भाऊबंद विश्वात इतर कुठे असू शकतात? आता मानवी वस्तीच्या शक्यता प्रत्यक्ष जाऊन तपासण्यासाठी माणसाने चांद्र व मंगळ मोहीम राबवल्या; पण त्यापलीकडच्या विश्वाचा वेध कसा घेणार? त्यासाठी अर्थातच पहिली शक्यता दिसते ती रेडिओ लहरींची! 

रेडिओ लहरींद्वारे कुठे तरी दूर असणाऱ्या मानवी वस्तीशी संपर्क साधता येईल अशी आशा शास्त्रज्ञांना अनेक वर्षांपासून आहे. असे रेडिओ संदेश पाठवण्याचे प्रयत्नही माणूस गेली अनेक दशकं करत आला आहे. अनेक वेळा कुठल्या तरी भलत्या फ्रिक्वेन्सीवर आलेल्या एखाद्या संदेशाने अशा मानवी वस्तीच्या अस्तित्वाची आशा वाढीसही लागलेली आहे. त्यातून आजपर्यंत फार काही ठोस हाती लागलेलं नाही. आता मात्र युनिव्हर्सिटी ऑफ टोरोंटोचा विद्यार्थी असलेल्या पीटर मा च्या नेतृत्वाखाली एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिदम बनवण्यात आला आहे. हा अल्गोरिदम वेस्ट व्हर्जिनियामधील ग्रीन बँक टेलिस्कोपमध्ये ८२० ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी बनवण्यात आला आहे.

हा अल्गोरिदम सर्व माहितीचं पृथक्करण करतो आणि त्याला सांगितलेल्या गोष्टींची माहिती वेगळी काढतो. सर्व प्रकारच्या रेडिओलहरींचा अभ्यास करून त्यातून येणाऱ्या सिग्नल्सचं पृथक्करण करण्याचं काम त्याला देण्यात आलं होतं. या अल्गोरिदमला एकूण ८ रेडिओ संदेश असे सापडले आहेत जे पृथ्वीवरून आल्यासारखे वाटत नाहीत.

या अल्गोरिदमला महाप्रचंड प्रमाणातील माहितीचं पृथक्करण करावं लागतं. त्यात आलेला बहुतेक सगळा डेटा हा माणसाने निर्माण केलेल्या रेडिओलहरींचा असतो. त्यातही प्रामुख्यानं मोबाइल फोन्स, जीपीएस अशा इलेक्ट्रॉनिक यंत्रांनी निर्माण केलेल्या लहरींचा वाटा त्यात फार मोठा असतो. मात्र, या आठ वेळा आलेल्या लहरी वेगळ्या प्रकारच्या होत्या.

ग्रीन बँक टेलिस्कोपवरच्या ब्रेकथ्रू लिसन या प्रकल्पावरील एक शास्त्रज्ञ स्टीव्ह क्रॉफ्ट या अल्गोरिदमच्या प्रकल्पावर काम करतात. ते म्हणतात, सामान्यतः पृथ्वीवरून निर्माण झालेल्या लहरी या ‘ब्रॉडबँड’ स्वरूपाच्या असतात. या आठ लहरी मात्र ‘नॅरो बँड’ स्वरूपाच्या होत्या. त्याशिवाय हा लहरींना एक स्लोप होता. त्यामुळेही असं वाटतं की या संदेशलहरी पृथ्वीवरून निर्माण झालेल्या नाहीत. इतकंच नाही तर आपण जेव्हा ताऱ्यांकडे बघतो त्यावेळी या लहरी असतात आणि त्या ताऱ्याकडून दुसरीकडे बघितलं की या लहरी नाहीशा होतात. त्यामुळे या संदेशलहरी केवळ कुठल्या तरी प्रकारचा अडथळा असतील असं वाटत नाही. कारण नुसताच अडथळा निर्माण करणाऱ्या लहरी सतत तिथेच असतात..

विश्वाच्या पसाऱ्यात माणसाचा सोबती!!या आठ संदेशलहरी कुठल्या तरी इतर ग्रहावरून किंवा खरं तर पृथ्वीबाहेरून आल्या आहेत असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही असं पीटर मा यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, तरीही त्यांचं एकूण स्वरूप बघता त्या अवकाशातून आल्या असतील अशी शक्यता नाकारता येत नाही. असंही त्यांचं म्हणणं आहे. विश्वाच्या पसाऱ्यात माणसाला कोणी तरी सोबती असेल अशा आशेने माणसाने उभा केलेला हा अजून एक प्रकल्प आहे. त्यात सापडलेल्या या रेडिओलहरी खरंच परग्रहवासीयांकडून आलेल्या असतील का? ते फक्त येणारा काळच सांगू शकतो.