जगभरात विविध प्रकराचे काम करुन पैसे कमवले जातात. मात्र लंडनमध्ये राहणारी एक महिला लोकांना मिठ्या मारुन तासाला 7 हजार रुपये आणि महिन्याला लाखो रुपये कमावत असल्याचे समोर आले आहे.
पेट्रा सजबान अशा या महिलेचे नाव असून तिने तीन वर्षांपूर्वी मिठी मारुन पैसे कमवण्याचे काम सुरु केले होते. या कामाला पेट्रा सोशल सर्व्हीस म्हणून ओळखले जाते. पेट्रा हे काम करण्यापूर्वी एका हॉस्पिटलमध्ये केअर असिस्टंटचे काम करत होती. पेट्रा लकवा झालेल्या म्हणजेच अर्धांगवायू असणाऱ्या अनेक रुग्णांची मदत करायची.
पेट्रा हे सर्व काम करत असताना रुग्णालयातील एका अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीच्या जवळ पेट्रा असल्याने चांगले वाटले. यानंतर त्याच महिलेने एकदा मिठी मारू शकते का अशी पेट्राला विचारणा केली. पेट्राने मिठी मारल्यानंतर त्या अर्धांगवायू असलेल्या महिलेला खूप आनंद झाला. पेट्राने यानंतर तिला रोज मिठी मारायला सुरुवात केली. पेट्राने म्हटले की, त्या महिलेला तिने मिठी मारणे फार चांगले वाटत होते. हळूहळू तिच्या तब्येतीत सुधारणा व्हायला लागली. यानंतर मिठी मारण्याच्या सर्व्हीसची कल्पना डोक्यात आली असल्याचे पेट्राने सांगितले.
या सर्व प्रकरणानंतर इंटरनेटवर शोध घेतल्यानंतर पेट्राच्या लक्षात आले की, मिठी मारणे ही देखील एक कला आणि एक थेरपी असून यानंतर प्रोफेशनल कडलरचा कोर्स करून तिने डीग्रीही घेतली. पेट्राने डीग्री घेतल्यानंतर प्रोफेशनल कडलिंगेची सर्व्हीस द्यायला सुरुवात केली. सर्वातआधी पेट्राने पतीबरोबर याबाबत चर्चा केली. तिला पतीने पाठिंबा दिला. मात्र पेट्राच्या मित्र- मैत्रिणींना ही कल्पना फारसी पटली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांना पेट्रोच्या सुरक्षेबाबत काळजी देखील वाटत होती.
पेट्राने सांगितले की, तिने जेव्हा मिठी मारण्याचे काम सुरु केले तेव्हा या व्यवसायामधील सर्वात पहिला ग्राहक जवळपास 30 वर्षांचा होता. हा व्यक्ती कामामुळे फार कंटाळलेला होता. तसेच त्याला दडपणामुळे नीट झोपही लागत नव्हती. मात्र पेट्राच्या या सोशल सर्व्हीसनंतर त्याला भरपूर फायदा झाला.
पेट्राने सांगितले की, मी ग्राहकांशी बराचवेळ चर्चा करुन त्यांच्या नेमक्या समस्या काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते. तसेच बोलताना त्यांना मिठी मारते, त्यांचा हात पकडते. हे सर्व करत असताना मी आधीच त्यांना मर्यादा सांगून ठेवते असं पेट्राने सांगितले. त्याचप्रमाणे माझ्यासोबत वेळ घालवून लोकांना चांगले आणि निवांत वाटत असल्याचे पाहून मला खूप आनंद होतो असं पेट्राने सांगितले.