खरंतर उद्योजकतेविषयी प्रारंभी मला काहीही माहिती नव्हते. मी बंगळुरूमध्ये काम करीत होताे आणि माझे आईवडील हैदराबादमध्ये होते. ते घरी जाण्यासाठी नेहमी बसने प्रवास करायचे. तिकिटासाठी मी ट्रॅव्हल एजंटाकडे जायचो आणि तो मला जागा मिळवून द्यायचा. पण, २००५ च्या दिवाळीत घरी जाण्यासाठी मी तिकीट बुक करायला गेलो. तेव्हा अनेक ट्रॅव्हल एजंट आणि बस ऑपरेटर्सना भेटलो. पण, मला सीट मिळू शकली नाही.
पहिल्या एजंटाने सांगितले की, तुम्ही दुसऱ्याशी संपर्क करून पाहा. असे करत मी तब्बल सहा ते सात एजंटांना भेटलो. कुणाकडूनच तिकीट न मिळाल्याने मला आश्चर्य वाटले की ट्रॅव्हल एजंट असूनही यांना बसमध्ये एक सीट रिकामी आहे की नाही हे ठाऊक नाही. सीट न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी मला खूप वाईट वाटले आणि या समस्येतूनच ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म या संकल्पनेचा जन्म झाला आणि हे स्टार्टअप यशस्वी झाले.
लाेक एक प्रश्न मला विचारायचे आधी मी अनेक कार्यक्रमात जायचो. तेव्हा लोक सतत मला एक प्रश्न विचारायचे की, चांगली नोकरी सोडून तुम्ही एका व्यवसायाला सुरूवात का केली? पण, आज हा प्रश्न मला कुणीच विचारत नाही. कारण नवीन उद्योगाविषयी मानसिकतेत मोठा बदल झाला आहे.
शिकण्याची संधी... - स्वप्ने पाहा, कारण तेच आपल्या कार्याची प्रेरणा बनतात.- संघर्ष न करता कोणतेही यश मिळत नाही, त्यामुळे मेहनत करा.- आपल्या विचारांमध्ये खूप शक्ती आहे, त्यांना सकारात्मक ठेवा.- जीवनात मोठा टप्पा गाठायचा असेल तर आधी छोटे छोटे टप्पे गाठा. - कधीही हार मानू नका; प्रत्येक चुकामध्ये काहीतरी शिकण्याचीसंधी असते.- विचारपूर्वक निर्णयाला मेहनतीची जोड दिली की यश मिळते.
सात हजार कोटींचा बिझनेसफणींद्र सामा यांनी अवघे पाच लाख रुपये गुंतवून आज सात हजार कोटी रुपयांचा बिझनेस उभा केला. त्यांचे स्टार्टअप आज देशभरात प्रसिद्ध आहे. कॉलेजमध्ये भेटलेल्या दोन मित्रांना सोबत घेऊन त्यांनी बिझनेस आयडिया प्रत्यक्षात उतरवली आणि यशस्वी करून दाखवली.
(संकलन : महेश घोराळे)