अंटार्क्टिकावर हरवलेले व ११८ वर्षे जुने चित्र सापडले आहे. अंटार्टिकाच्या अति पूर्वेकडील केप अडेर या द्विपकल्पावरील झोपडीत हे अतिशय नाजूक चित्र पाहून शास्त्रज्ञ चकीत झाले. हे चित्र ब्रिटिश पोलार एक्स्प्लोलर डॉ. एडवर्ड विल्सन यांनी काढलेले होते. त्यांचे निधन त्यांच्या मोहिमेचे नेते रॉबर्ट फाल्कन स्कॉट यांच्यासोबत अंटार्टिकावर झाले. हे चित्र अतिशय काळजीपूर्वक जपून ठेवल्याचे आढळले. हे चित्र झोपडीत पेग्विंनच्या विष्ठेमध्ये आणि कागदाच्या घड्यांमध्ये व्यवस्थित ठेवलेले होते. १९११ मध्ये काढण्यात आलेल्या मोहिमेत ते या झोपडीत राहिले होते. या मोहिमेवरून ते दोघे कधीही परतले नाहीत. या अतिशय नाजूक चित्रावर ‘१८९९ ट्री क्रीपर’ असे लिहिलेले आहे. झाडावर चढणाऱ्या व पांढरी छाती असलेल्या पक्ष्याचे हे चित्र आहे. विल्सन यांनी हे चित्र काढल्यानंतर १२ वर्षांनी केप अडेर झोपडीत ते कसे गेले हे रहस्यच आहे.
अंटार्क्टिकावर सापडले ११८ वर्षांपूर्वीचे पक्ष्याचे चित्र
By admin | Published: July 07, 2017 1:34 AM