Emergency Landing On A Highway: वेगवेगळ्या कारणांमुळे विमानांना विमानतळावर किंवा लॅंडिंग स्ट्रिप्सनवर इमरजन्सी लॅंडिंग करावी लागते. पण सिंगल प्रोपेलर एयरक्राफ्ट आपल्या छोट्या आकारामुळे आणि कमी वजनामुळे काही वेळा शेत, रस्ते किंवा लहान भागांमध्ये लॅंडिंग करू शकतात. एकदा 2022 मध्ये एका छोट्या विमानाचं लॅडिंग कॅमेरात कैद झालं होतं. उत्तर कॅरोलिनामध्येमध्ये व्हिडिओत एका छोट्या प्रोपेलर विमानाला दिवसाच्या वेळी फ्रीवे च्या मधोमध लॅंडिंग करताना दाखवलं आहे. या घटनेचा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे.
रिपोर्टनुसार, पायलट विंसेंट फ्रेजरने एका बिझी फोर-लेन हायवेवर इमरजन्सी लॅंडिंग केलं होतं. फ्रेजर म्हणाला की, तो त्याच्या सासऱ्यासोबत ग्रेट स्मोकी पर्वताच्या वरून उड्डाण घेत होता. तेव्हाच सिंगल इंजिन असलेलं विमान अचानक फेल झालं. अनेक अडथळे सुरक्षित पार करत त्याने फ्रीवेवर यशस्वी लॅंडिंग केलं.
इनसाइड एडिशनच्या रिपोर्टनुसार, त्यांचं विमान हायवेवर एकाही गाडीला भिडलं नाही. चालत्या गाड्यांच्या मधोमध त्याने विमानाचं लॅंडिंग केलं. कुणाला काही इजा झाली नाही. स्वेन काउंटी शेरिफने लॅंडिंगचं फुटेज आपल्या फेसबुक पेजवर शेअर केलं.
पोस्टमध्ये फ्रेजरने लिहिलं की, 'त्यावेळी माझ्या डोक्यात एकच गोष्ट सुरू होती की, मला माझ्या सासऱ्यांना सुरक्षित ठेवायचं आहे आणि रस्त्यावरील लोकांना सुरक्षित ठेवायचं आहे'. फ्रेजर म्हणाला की, त्याने एका पुलासमोर असलेल्या नदीत विमान उतरवण्याचा विचार केला होता. पण त्याला इतक्यात हायवे दिसला. सुदैवाने कुणाला काही झालं नाही.