तुम्ही आत्तापर्यंत अनेक सुंदर तलाव पाहिले असतील, त्या पाण्यात उड्या मारल्या असतील. भारतात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तलाव आढळतात. कुठे गरम पाण्याचे तलाव आहेत तर कुठे थंड पाण्याचे आहेत. पण तुम्ही कधी गुलाबी रंगाचं पाणी असलेला तलाव पाहिलाय का? नाही ना? पण असा एक तलाव आहे. सध्या या आगळ्या वेगळ्या तलावाला पाहण्यासाठी चांगलीच गर्दी होते आहे.
कुठे आहे हा तलाव?
जगात अशा अनेक विचित्र, आश्चर्यकारक जागा आहेत. अशीच एक जागा ऑस्ट्रेलियामध्ये आहे. हिलर आणि सलाइन नावाने हा तलाव प्रसिध्द आहे. हा तलाव जगातला सर्वात लहान तलाव मानला जातो. सुंदर आणि आकर्षक तलावाचा रंग बेबी पिंक रंगाशी मिळता जुळता आहे. या तलावाचं क्षेत्रफळ केवळ 600 मीटर आहे. या तलावाच्या चारही बाजूने पेपरबार्क आणि यूकेलिप्टस झाडे आहेत. जगभरातून हा तलाव पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.
गुलाबी पाणी कसं?
जगातल्या या सर्वात लहान तलावात जास्त प्रमाणात मीठ, बॅक्टेरिया आणि एल्गी आहे. याच कारणाने या तलावात सूर्याची किरणे पडताच यातील पाणी गुलाबी रंगाचं दिसायला लागतं. या पाण्यात मीठ, बॅक्टेरिया आणि एल्गी अधिक प्रमाणात असूनही हे पाणी सुरक्षित आहे.
इथे करु शकता बोटिंग आणि स्विमिंग
हा तलाव पाहण्याची लोकांमध्ये चांगलीच क्रेझ वाढली आहे. वर्षातील 12 महिने इथे पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. खूप गर्दी असल्याने सर्वांनाच इथे बोटींग करता येत नाही. काही मोजक्याच लोकांना ही संधी मिळते.