कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक धक्कादायक घटना नेहमीच समोर येत असतात. अशीच एक घटना आता हरयाणाच्या सोनीपतमध्ये घडली आहे. इथे एक महिला आपल्या पिटबुल डॉगला घेऊन लिफ्टमध्ये जात होती. यादरम्यान तिथे एक दुसरी व्यक्तीही आली. तेव्हा पिटबुलने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पीडित व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नॅशनल हायवे 44 जवळील कुंडली पार्कर रेसीडेन्सीमधील आहे. सुदर्शन नावाची एक व्यक्तीने नेहमीसारखी मॉर्निंग वॉकला गेली होती. जेव्हा ती व्यक्ती परत आली तेव्हा तेव्हा लिफ्टकडे गेली. यादरम्यान पूनम नावाची महिला आपल्या पिटबुल डॉगी घेऊन लिफ्टमध्ये होती. जसा लिफ्टचा दरवाजा उघडला आणि व्यक्ती लिफ्टमध्ये गेली पिटबुलने हल्ला केला.
पिटबुलने या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला. ज्यानंतर तो गंभीर जखमी झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. आता त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. सुदर्शन यावर म्हणाला की, सोसायटीमध्ये अशी एक नाही तर तीन ते चार कुत्री आहेत. सरकारने बंदी घातली आहे. तरीही पिटबुल प्रजातीची कुत्री लोक पाळतात.
सुदर्शन म्हणाला की, मी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पण पोलीस अधिकारी कोणतीही कठोर कारवाई करत नाहीयेत. रेसीडेन्सी वेलफेअर असोसिएशनमध्येही तक्रार केली आहे. त्यांनी आश्वासन दिलं आहे की, कुत्र्याच्या मालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल. पण प्रश्न हा आहे की, बंदी असूनही लोक या प्रजातीची कुत्री कशी पाळत आहेत.