शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

असा देश जिथे कबरेत मृतदेह ठेवण्यासाठी द्यावं लागतं भाडं, भाडं नाही दिलं तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 1:21 PM

हा सुंदर देश एकेकाळी गृहयुद्धाच्या आगीत पेटला होता. मात्र, तरिही येथील लोक सतत हसतमुख आणि आनंदी असतात. 

जगातल्या अनेक देशांमधील विचित्र नियम नेहमीच चर्चेत असतात. कुठे सार्वजनिक ठिकाणी कपलला फिरता येत नाही तर कुठे लहान कपडे घालता येत नाही. पण आज आम्ही तुम्हाला एका देशातील त्याहून अजब नियमाबाबत सांगणार आहोत. या देशाचं नाव आहे ग्वातेमाला. हा सुंदर देश एकेकाळी गृहयुद्धाच्या आगीत पेटला होता. मात्र, तरिही येथील लोक सतत हसतमुख आणि आनंदी असतात. 

वेगवेगळ्या रिपोर्टनुसार, जगात सर्वात जास्त हत्त्या ग्वातेमाला येथे होतात. तरी सुद्धा हॅपीनेस इंडेक्सबाबतीत 1.66 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला हा देश 100 देशांच्या यादीत असल्याचे सांगितले जाते.

या देशात सार्वजनिक बसला लोक 'चिकन बस' असं म्हणतात. कारण या बसमध्ये त्यांच्यासोबतच मोठ्या प्रमाणात बकऱ्या आणि कोंबड्याही वाहून नेल्या जातात.

ग्वातेमालातील सर्वात विचित्र नियम म्हणजे इथे मृतांना कबरेत ठेवण्यासाठी दर महिन्याला भाडं द्यावं लागतं. ज्या परिवारातील व्यक्तीची कबर असते, ते व्यक्ती जर एखाद्या महिन्यात भाडं देऊ शकले नाहीत तर मृतदेह कबरेतून काढून बाहेर ठेवला जातो आणि त्याजागी दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह ठेवला जातो.

असं असलं तरी येथील सरकारने वेगवेगळ्या शहरांच्या बाहेर एक स्मशानभूमी तयार केली आहे. इथे त्या मृतदेहांना दफन केलं जातं, ज्यांचे परिवार दर महिन्याला कबरेचं भाडं देऊ शकत नाहीत.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके