Viral News: गेल्या अनेक दशकांपासून शास्त्रज्ञ अंतराळातील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत अनेक देशांनी अंतराळात आपले यान पाठवले आहे. पण, अजूनही अंतराळाचे अनेक रहस्य आपल्यासाठी गुढ रहस्य बनून राहिले आहेत. यातच आता पृथ्वीवर चंद्रासारखा पृष्ठभाग तयार करण्यात आला आहे.
युरोपमधील सर्वात सक्रिय ज्वालामुखी असलेल्या माउंट एटनाचे वातावरण चंद्रासारखे किंवा मंगळासारखे आहे. त्यामुळेच अंतराळात पाठवण्यात येणाऱ्या रोबोटला अवकाशात पाठवण्यापूर्वी प्रशिक्षणासाठी येथे आणण्यात आले आहे. जर्मनीची स्पेस एजन्सी जर्मन एरोस्पेस सेंटर आणि युरोपियन स्पेस एजन्सी संयुक्तपणे Arches नावाचा हा प्रकल्प चालवत आहेत.
रिमोट ऑपरेटेड रोबोटइटलीच्या सिसिली प्रदेशातील माउंट एटना येथे 2,600 मीटर उंचीवर अनेक रिमोट कंट्रोल रोबोट्सची चाचणी घेण्यात येत आहे. चंद्र किंवा मंगळाच्या मोहिमेदरम्यान या रोबोट्सना कोणत्या संभाव्य परिस्थितींचा सामना करावा लागतो, याचे शास्त्रज्ञांना आकलन करायचे आहे. हा परिसर त्या परीक्षणासाठी अनुकूल असल्यामुळे येथे रोबोटचे परीक्षण केले जात आहे.
माउंट एटना परिसरात काय आहेजर्मन स्पेस अजन्सीचे सिस्टम डेव्हलपर बर्नहार्ड वोडर्मायर यांनी रॉयटर्सला सांगितले की, माउंट एटना हे असे ठिकाण आहे, ज्याची तुलना चंद्र किंवा मंगळाच्या संरचनेशी केली जाऊ शकते. त्यांनी यापूर्वीच्या मोहिमांमध्येही याचा वापर केला आहे. चंद्र किंवा मंगळावर रोबोटचे एक कार्य म्हणजे नमुने गोळा करणे आणि त्यांची चाचणी करणे. मग तो डेटा पृथ्वीवरील शास्त्रज्ञांना पाठवला जातो. माउंट एटनावर याचेच परीक्षण केले जात आहे.