सध्या बहुतांश लोक विमानाने प्रवास करण्यास अधिक प्राधान्य देतात. विमान प्रवासाने कमी वेळात अधिक अंतर कापले जाते. तसेच सध्या रस्ते अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामुळे लोक विमान प्रवास अधिक सुरक्षितही मानत आहेत. खरे तर, विमान प्रवासात धोका कमी असतो. कारण बरीच चेकिंग झाल्यानंतरच विमान टेक ऑफ होते. मात्र असे असले तरी, म्हणतात ना की, नशिबात जे असेल ते होतेच. एका प्लेन एक्सपर्टने विमान अपघातांसंदर्भात काही खास गोष्टी रिव्हिल केल्या आहेत.
या प्लेन एक्सपर्टने विमानातील सर्वात सुरक्षित सीट कोणते हे सांगितले आहे. अर्थात, विमान क्रॅश झाल्यास आपण कोण्यात सीटवर अधिक सुक्षित राहू शकता? ही बातमी समोर आल्यानंतर आता लोक विमानाचे बुकिंग करताना याच सीटला प्रेफरन्स देत आहेत. एव्हिएशन एक्सपर्ट व्हॅन्स हिल्डेरमन यांनी यासंदर्भात खुलासा केला आहे. व्हॅन्स हिल्डेरमन AFuzion चे सीईओ आणि एक लेखकही आहेत. यांचे एव्हिएशन इंडस्ट्रीला सेफ्टी सर्टिफिकेट देण्याचेही काम आहे. त्यांनी डेली स्टारसोबत बोलताना हा खुलासा केला आहे.
प्लेन क्रॅश झाल्यास नुकसान होणार नाही...? -व्हॅन्स हिल्डरमन यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या जेवढ्या विमान अपघातात लोक वाचले आहेत, त्या सर्वांचे सीट मध्यभागी होते. भीषण अपघातातही हे लोक वाचले आहेत. तसेच, अपघात थोडा कमी धोकादायक असेल, तर विंग्स जवळील लोकांचेही कमी नुकसान होते. मात्र, सर्वात महत्वाचे म्हणजे, विग्समध्ये इंधन कंटेनर असते. अशा स्थितीत त्यात ब्लास झाला तर सर्वात पहिले यांचाच बळी जातो.
याशिवाय व्हॅन्स हिल्डरमन यांनी सांगितले की, हे अपघात टाळण्यात मानवी मेंदूही मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावतो. जर आपण मानसिकदृष्ट्या खंबीर असाल तर अपघातातून वाचू शकतात. अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही. धीर धरा आणि आपला जीव वाचवा.