ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 4 - हल्लीच्या जमान्यात अनेकांना स्मार्टफोनचे व्यसन जडल्याचं पाहायला मिळते. अनेक शास्त्रज्ञांनी स्मार्टफोनचा अतिवापर हा धोकादायक असल्याचं सांगितलं आहे. मात्र स्मार्टफोनचे काही फायदेही समोर आले आहेत. स्मार्टफोनवर गेम खेळल्यास तणाव दूर होण्यासाठी मदत होते, असा शोध अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी लावला आहे. शास्त्रज्ञांनी संशोधनासाठी एका विशिष्ट पद्धतीचा गेम तयार केला आणि मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तींवर त्याचा प्रयोग केला. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या मते, मनोविकार जडलेल्या लोकांचा गेम खेळल्यामुळे तणाव दूर होऊन त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते. तसेच मानसिक संतुलन बिघडलेल्या लोकांनी आठवड्यातून पाच वेळा 20 मिनिटांसाठी गेम खेळणे गरजेचं असल्याचं मतही त्यांनी मांडलं आहे. मात्र त्यातील काही जण ब-याच काळापासून गेम खेळत आहेत. दरम्यान, उपचाराऐवजी व्हिडीओ गेमच्या माध्यमातून मानसिक संतुलन सुधारण्याची पद्धत जास्त प्रभावी आहे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणे आहे. मनोविकार दूर करण्यासाठी थेरपीसारखेच व्हिडीओ गेम खेळण्याची पद्धतही सकारात्मक परिणाम देते. त्यामुळेच सामान्य मनोरुग्णांना याचा फायदा होऊ शकतो, असंही शास्त्रज्ञ म्हणाले आहेत.
स्मार्टफोनवर गेम खेळा, तणाव घालवा !
By admin | Published: January 04, 2017 9:47 PM