Viral Video : खेळाच्या मैदानात अनेकदा अशा घटना घडतात ज्या बघून खेळाडूंसोबतच प्रेक्षकही हैराण होतात. मग मैदान क्रिकेटचं असो वा बेसबॉलचं. नुकतीच बेसबॉल खेळादरम्यान घडलेली एक घटना हैराण करणार ठरली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यावर लोक अपांयरचं कौतुक करत आहेत.
ही घटना अमेरिकेच्या फ्लोरिडामधील आहे. गेल्या रविवारी यूथ बेसबॉल गेम दरम्यान अचानक वादळ आलं. धुळीच्या या चक्रीवादळात मॅच खेळत असलेला एक 7 वर्षाचा मुलगा अडकला. तो त्या वादळात अडकला होता. तेव्हाच बाजूला उभ्या असलेल्या अंपायरने त्याला वाचवलं.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात तुम्ही बघू शकता की, लहान मुलांची बेसबॉल मॅच सुरू आहे. यादरम्यान मैदानात चक्रीवादळ येतं. यावेळी बॅटींग करणारा मुलगा बाजूला होतो, पण किपिंग करणारा मुलगा या वादळात अडकतो. तेव्हाच अपांयर लगेच धावत जाऊन त्या मुलाला वादळातून बाहेर काढतो.
यावेळी वादळामुळे अपांयरची टोपी उडून जाते. नंतर काही मिनिटांमध्ये स्थिती सामान्य होते आणि बेसबॉल गेम पुन्हा सुरू होतो. फॉक्स न्यूजनुसार, ही मॅच जॅक्सनविलेच्या फोर्ट कॅरोलीन एथलेटिक असोसिएशन बेसबॉल मैदानावर सुरू होती. तेव्हा 7 वर्षाचा खेळाडू या वादळात अडकतो. तो नंतर म्हणाला की, मी घाबरलो होतो, मला वाटलं ते वादळ मला आत खेचून घेईल.