टेक्सास: जगभरातून रोज आश्चर्यचकित करणाऱ्या अनेक बातम्या येत असतात. अमेरिकेतील टेक्सासमधून अशाच प्रकारची एक बातमी आली आहे. केक्सासमधील एका प्राणीसंग्रहालयाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपलेल्या फोटोमध्ये एक अज्ञात प्राणी प्राणीसंग्रहालयात फिरताना दिसला आहे.
फोटो व्हायरलसीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्राणी दोन पायांवर उभा असल्याचे दिसत असून, त्याचे कान टोकदार दिसत होते. चित्रात तो प्राणीसंग्रहालयाच्या बाहेर दिसला. प्राणीसंग्रहालयाच्या बाहेर हा कोणता प्राणी फिरत होता, हे अद्याप कोणालाच समजू शकले नाही. एएनआय डिजिटलने हा फोटो शेअर केला आहे. तसेच कॅप्शन लिहिले आहे, 'चुपकबरा? टेक्सास प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यात कैद झालेला 'विचित्र' प्राणी ओळखण्यासाठी लोकांची मदत घेतली आहे.'
कुपकबारा की एलियन?हे चित्र गेल्या 21 मे रोजीचे असून, रात्री 1.25 वाजता ते टिपले गेले होते. व्हायरल होत असलेला हा फोटो अमारिल्लो प्राणीसंग्रहालयाचा आहे. चित्रात एक रहस्यमय प्राणी दिसत आहे, जो प्राणीसंग्रहालयाच्या आवारात फिरत होता. या प्राण्याचे चित्र स्पष्ट नव्हते, परंतु त्याचे दोन पाय आणि टोकदार कान दिसत आहेत. काही लोक याला एलियन म्हणत आहेत तर काही लोक चुपकबरा म्हणत आहेत.