आता लग्नं अधिक रोमांचक करण्यासाठी वेगवेगळ्या रोमांचक गोष्टी केल्या जातात. अशात वेडींग प्लॅनर कंपन्यांची चांगलीच चांदी असते. या कंपन्या वेगवेगळ्या कॉन्सेप्टने लग्नांचं अरेंजमेन्ट करतात. जपानच्या ESCRIT नावाच्या कंपनीने एक वेगळीच कॉन्सेप्ट आणली आहे. Pokemon Wedding अशी कॉन्सेप्ट त्यांनी आणली.
Pokemon Wedding मध्ये लग्न करणारे कपल्सकडे दोन पिकाचू उभे असतात. एक मेल आणि एक फिमेल. ते दोघेही लग्न करतात. पाहुण्यांची काळजी घेतात. ते नवरी-नवरदेवासारखं सगळंकाही करतात. इतकेच नाही तर लग्नात पदार्थ सुद्धा Pokemon स्पेशल असतात.
हे इतक्यावरच थांबत नाही तर लग्नाचं सर्टिफिकेट सामान्य सरकारी कागदपत्रांसारखं नसतं. तर Pokemon स्टाइलचं असतं. यात थोडी क्रिएटीव्हिटी बघायला मिळते.
भारतातही आता लग्नात वेगवेगळ्या कॉन्सेप्ट येऊ लागल्या आहेत. वेडींग फोटोशूटने आधीच मार्केट गजबजलेलं आहे. वेडींग प्लॅनरही नवं काहीतरी शोधत असतात. त्यामुळे भारतातही असं लवकरच बघायला मिळालं तर नवल वाटायला नको.