कानपूर - शहरातील बिधनू परिसरात न्यू आझाद नगर पोलीस चौकीत घडलेल्या एका घटनेने सगळेच अचंबित झाले आहेत. याठिकाणी पोलीस अधिकारी सुधाकर पांडे जे रात्री चौकीत झोपले होते. त्यावेळी चोरांनी धाड टाकली. या चोरांनी बेधडकपणे अधिकाऱ्याची पिस्तुल आणि कारतूस लंपास केले. त्याचसोबत एक असं कोडं बनवलं जे सोडवणं पोलिसांसमोर आव्हान बनलं आहे.
पिस्तुल आणि कारतूसासोबत चोरांनी अधिकाऱ्याची बॅग पळवली. त्यात काही सामान आणि कपडे होते. चोरांनी त्याला आग लावून जाळून टाकलं. त्यामुळे चोरांनी अधिकाऱ्याचे कपडे का जाळले याचं उत्तर कुणाकडेच नाही. चोरी केल्यानंतर चोर पळून जाण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा पोलीस चौकीतच चोरी करत असेल तर चोर लवकर निसटण्याचा प्रयत्न करेल. मात्र याठिकाणी चोरांनी आरामात सगळं कृत्य उरकलं.
चोरांनी कपड्याला आग का लावली?हे चोर कोण आहेत त्यांनी कपड्यांना आग का लावली? हे गूढ उकलणं आव्हानात्मक आहे. सध्या शोध आणि तपास करण्यासाठी एसपी, आयजी स्वत: घटनास्थळी हजर झाले. त्यांनी पोलीस अधिकाऱ्याला धडा शिकवला आणि त्यानंतर त्याला निलंबित केले. एसपी तेज स्वरुप सिंह यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ५ जणांची टीम बनवली आहे. चोरांनी अधिकाऱ्याचे कपडे पळवून त्याला आग का लावली याचा शोध घेतला जात आहे.
ऑक्टोबर महिन्यात कानपूरच्या महाराजपूर परिसरात रस्त्याशेजारी असलेल्या युवकाचा मोबाईल पोलिसानेच चोरल्याची घटना घडली होती. त्याची ही हरकत कुणासमोर उघड होणार नाही असं त्याला वाटलं. परंतु सीसीटीव्हीत हा प्रकार रेकॉर्ड झाला आणि चोरीचा मामला उघडला. त्यानंतर आरोपी पोलिसाला निलंबित करून त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"