बकऱ्या जेव्हा मलाद्वारे शरीरातील नको असलेले पदार्थ बाहेर काढतात. तेव्हा साधारणपणे बकऱ्यांची विष्ठा फेकून दिली जाते. तुमचा विश्वास बसणार नाही पण जगात असा एक देश आहे. ज्या ठिकाणी बकऱ्यांच्या मलास खूप मोठी किंमत आहे. लोक बकऱ्यांच्या विष्ठेने लाखो रुपये कमावत आहेत. तुम्ही विचार कराल बकऱ्यांच्या विष्ठेत असं काय असतं. आज आम्ही तुम्हाला याच बाबत सांगणार आहोत.
आफ्रिकेतील मोराक्को या देशात बकऱ्या एका झाडावर चढतात आणि झाडाची फळं चावून खातात. इतकंच नाही तर बकऱ्यांचा मालक सुद्धा यांना झाडांवर चढण्यापासून रोखत नाही. कारण या झाडांची फळ खाल्यानंतर बकऱ्यांची विष्ठा बाहेर येते. त्यातून मालकाला नफा मिळत असतो.
आता तुम्ही विचार करत असाल असं कोणतं झाड आहे. ज्याची फळ खाल्ल्यानंतर बकऱ्यांमधून बाहेर येत असलेली विष्ठा लाखो रुपये मिळवून देते. या झाडाला आर्गन असं म्हणतात.या झाडाला लागणारी फळं बकऱ्या खातात आणि पचवण्यासाठी अकार्यक्षम असल्यामुळे विष्ठेमार्फत तशाच बाहेर टाकून देतात. त्यानंतर मालकांचं विष्टेमार्फत लाखो रुपये कमावण्याचं काम सुरू होतं.
विष्ठा एकत्र करून बकऱ्यांचे मालक घरी घेऊन जातात. त्यानंतर त्यातून आर्गनच्या बीया वेगळ्या करतात. त्यानंतर आतील दाण्यांना काढून भाजून घेतात. मग हाताने पीठ तयार करण्याच्या गिरणीवर म्हणजेच जात्यावर दळून घेतात. त्यातून तेल बाहेर येतं. याला आर्गन ऑईल असं म्हणतात. ज्याचा वापर अनेक सौंदर्य प्रसाधानांमध्ये या तेलाची किंमत तिथे ६० ते ७० हजार प्रतिलिटर आहे. हे तेल विकून लाखो रुपये कमावले जातात.
लॉकडाऊनमध्ये झाली 'लगीनघाई'; अन् मग बॉर्डरवरच उडवला लग्नाचा बार
बाबो... लॉकडाऊनमध्येही 'कडकनाथ' कोंबड्यांची लूट; सीसीटीव्हीत चोरटे झाले शूट