सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काहीना काही बोलत राहतो. कधी घरातील लोकांसोबत, कधी मित्रांसोबत तर कधी ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत...बोलण्याचा सिलसिला सुरूच राहतो. पण तुम्ही विचार केलाय का की, आपण दिवसभरात साधारण किती शब्द बोलत असू? तुम्ही कदाचित याकडे कधी लक्ष दिलं नसेल. आता बोलणं आपलं रोजचंच काम असल्याने ही माहिती तुम्हाला इंटरेस्टींग वाटू शकते.
प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यवहारानुसार बोलतो. कुणी कमी बोलता तर कुणाला जास्त बोलण्याची सवय असते. लिंक्डइन लर्निंग इन्स्ट्रक्टर Jeff Ansell च्या Research नुसार, सामान्यपणे एक व्यक्ती दिवसभरात कमीत कमी ७ हजार शब्द बोलतो. काही लोक यापेक्षा जास्तही बोलत असतील. (हे पण वाचा : Shocking: चीनमध्ये का पिलं जातं झुरळांचं सूप आणि सरबत? कारण वाचून व्हाल हैराण...)
यानुसार जर सरासरी काढली तर एक व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यात ८६०,३४१,५०० शब्द बोलतो म्हणजे साधारण ८६ कोटी शब्द. म्हणजे संपूर्ण आयुष्यात तुम्ही बरीच एनर्जी ८६ कोटी शब्द बोलण्यात लावता. एक ब्रिटीश लेखक आणि ब्रॉडकास्टर Gyles Brandreth ने त्याचं पुस्तक The Joy of Lex: How to Have Fun with 860,341,500 Words मध्ये याची माहिती दिली आहे. आता तुम्ही म्हणाल की इतके शब्द डिक्शनरीमध्ये आहेत का? (हे पण वाचा : हे खासप्रकारचे पॉर्न व्हिडीओ येत्या काळात बनू शकतात 'महामारी', तज्ज्ञांकडून खळबळजनक दावा)
जर या शब्दांची तुलना इतर गोष्टींसोबत केली तर प्रत्येक सामान्य व्यक्ती आपल्या जीवनात Oxford English Dictionary चे २० व्हॉल्यूम १४.५ वेळा वाचू शकेल. याचा अर्थ असा आहे की, २० व्हॉल्यूमध्ये जेवढे शब्द लिहिलेले आहेत, व्यक्ती ते १४.५ वेळा बोलतो. जर व्यक्तीच्य शब्दांची तुलना Encyclopedia च्या ३२ व्हॉल्यूमसोबत केली तर त्या शब्दांनी १९.५ पुस्तके लिहिली जाऊ शकतात. जर बायबलसोबत तुलना केली तर जेवढे शब्द King James Bible मध्ये आहेत, त्यापेक्षा १११० पटीने जास्त शब्द व्यक्ती आपल्या आय़ुष्यात बोलतो.