अनेकदा नको त्या कॉलसेंटरच्या कॉल्सनी पुरता वैताग आणलेला असतो. लॉकडाऊनमध्येही पॉलिसी विक्रीचे तसेच बँकेकडून लोन देण्यात येत असल्याचे कॉल्स येत असतात. अशात एका कॉलसेंटरच्या कॉलला एका समोसा विक्रेत्य़ाने दिलेला मजेशीर रिप्लाय सध्या तुफान व्हायरल झाला आहे. लॉकडाऊनमध्ये संपूर्ण उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. या काळात बँकांनी आता लोन घेण्यासाठी लोकांना फोन करत पुरते हैराण करून सोडले आहे.
अनेकजण त्यांचे कॉल्स उचलतात तर अनेकांना कंटाळा येतो. तर अनेकजण मस्त फिरकी घेतात. फिरकी घेतलेली ही ऑडीओ क्लिप सध्या साऱ्यांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. बँकेकडून कॉल येतो आणि कस्टमर केयर एग्जीक्यूटिव तुम्हाला सध्या लोनची गरज आहे का? असा प्रश्न विचारते. यावर समोरचा व्यक्ती बोलतो लोन तर हवे आहे ट्रेन खरेदी करायची आहे. त्यासाठी ३०० कोटींची गरज आहे. हे ऐकून कस्टमर केयर एग्जीक्यूटिव देखील थोडी हडबडते आणि पुन्हा सगळी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करते.
त्यानंतर या माणसाने दिलेले भन्नाट उत्तर ऐकून तुम्हीही हसून-हसून लोटपोट व्हाल, कस्टमर केयर एग्जीक्यूटिव तुमचा व्यवसाय काय आहे? या प्रश्नावर माझा समोस्यांचा ठेला आहे. १५०० रू दिवसाला कमावतो, असे तो सांगतो. कोणत्याही प्रकारचे बँक खातेही आपल्या नावे नसल्याचे तो तिला सांगतो. ४ मिनिटांची ही क्लिप असून तुफान व्हायरल झाली आहे.