ही घटना चीनमधील असून २००२ सालातील आहे. सान्ग जियांग महिला आणि लहान मुलांच्या तस्करीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. काही दिवसातच तो तुरूंगातून फरार झालाय. आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल १७ वर्षांनंतर तो पुन्हा पकडला गेला आहे. त्याला पोलिसांनी घनदाट जंगलातून ताब्यात घेतलं. तो इथे एका गुहेत आरामात राहत होता.
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, सान्ग अनेक वर्ष या घनदाट जंगलात जगापासून, लोकांपासून दूर राहत होता. या गुहेतच त्याने त्याचं घर थाटलं होतं. तो आरामात इथे जगत होता. कारण इथे कुणी येत-जात नव्हतं.
कसं पकडलं?
यूनाना प्रांतातील पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने जंगलाच्या त्या भागावर नजर ठेवली, जिथे त्यांना मनुष्याची हालचाल दिसली. जंगल इतकं दाट आणि भयावह होतं की, पोलीस तिथे जाऊन त्याच्यावर नजर ठेवू शकत नव्हते. अशात ड्रोनने ती व्यक्ती सान्ग असल्याचं कन्फर्म केलं, नंतर त्याला पकडण्यात आलं.
पोलिसांनी सांगितले की, सान्द नदीवर पाणी भरण्यासाठी जात होता. तसेच झाडांची लाकडे जाळून त्यावर जेवण तयार करत होता. यावरूनच आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचलो. सान्गला पोलिसांनी पुन्हा तुरूंगात पाठवलं आहे. त्याला त्याची शिक्षा पूर्ण करावी लागले.