अनेक लोक आपल्या नात्यात इमानदारी दाखवत नाही. ज्यामुळे त्यांचं नातंही बिघडतं. बऱ्याचदा जेव्हा एका पार्टनरला किंवा पती-पत्नीपैकी एकाला दुसऱ्यावर संशय आला तर सत्य जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. बरेचजण एखादा प्रायव्हेट डिटेक्टिव हायर करतात आणि त्याला जोडीदाराच्या मागे लावतात. जेणेकरून त्याचं सत्य समजावं. अशाच एका प्रायव्हेट डिटेक्टिवने सांगितलं की, तो कसा दगा देणाऱ्या पुरूषांना पकडतो आणि कशाप्रकारे ते पकडले जातात?
डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या कनेक्टिकटमध्ये राहणाऱ्या प्रायव्हेट इंवेस्टिगेटर रे रॅनोने सांगितलं की, त्याच्या कामातील 40 टक्के भाग हा आपल्या पार्टनरला किंवा पत्नीला दगा देणाऱ्या पुरूषांना शोधणं हा आहे. तो म्हणाला की, ज्या पुरूषांचं अफेअर असतं ते नेहमीच एक सामान्य चूक करतात. ज्यावरून ते पकडले जातात. तो म्हणाला की, अनेकदा पत्नी किंवा गर्लफ्रेंड्स त्याला त्यांच्या पार्टनरवर नजर ठेवण्यासाठी पैसे देतात.
काय चूक करतात पुरूष?
तो त्या पुरूषांवर लक्ष ठेवतो. त्याने पुरूषांच्या एका कॉमन चुकीबाबत सांगितलं. तो म्हणाला की, पुरूष नेहमीच कार धुवायला नेण्याचं कारण देतात आणि त्यानंतर दुसऱ्या महिलेला घेण्यासाठी जातात. पत्नीला ते हेच कारण देऊन घराबाहेर पडतात. त्यामुळे ते नेहमीच आपली कार स्वच्छ ठेवतात.
खास कॅमेराचा करतो वापर
पॉडकास्टर इयान बिकसोबत बोलताना रे ने सांगितलं की, जसाही एखादा पुरूष कार धुण्यासाठी घेऊन जातो तेव्हा त्याला समजून येतं की, तो पुढे काय करणार आहे. पुरूष पुढे जातो आणि महिलेला पिक करतो. अशात रे त्यांचा व्हिडीओ बनवण्यासाठी खास वस्तूंचा वापर करतो. जर तो कुणाचा पाठलाग करत कॉफी शॉपमध्ये गेला तर आपल्यासोबत आपला कॉफी कप घेऊन जातो. पण मुळात तो कॉफी कप नाही तर एक हाय डेफिनेशन कॅमेरा आहे. त्यात कॅमेरा लपवलेला आहे.