Professional Cuddler Woman Charges 8000 Rupees: जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या असतात. काही लोकांची नोकरी फारच डिमांडिंट असते आणि यासाठी त्यांना भरपूर वेळही द्यावा लागतो. तर काही लोकांच्या नोकरी या वेगळ्या पद्धतीच्या असतात. ज्यात त्यांनी शारीरिक मेहनत कमी आणि भावना जास्त दाखवाव्या लागतात. एक अशीच नोकरी आहे प्रोफेशनल कडलर. ज्यात लोक प्रेम आणि शांतता मिळवण्यासाठी पैसे खर्च करतात.
आपल्या देशात प्रत्येक गोष्टीवर लोक एकमेकांना मिठी मारतात. आनंद असो वा दु:ख, एक झप्पी तर मिळतेच. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, परदेशात प्रेमाने मिठी मारण्याचेही पैसे द्यावे लागतात. मिसी रॉबिनसन नावाची महिला हेच काम करते. ती एक प्रोफेशनल कडलर आहे. जी लोकांनी मिठी मारून त्यांची चिंता, तणाव दूर करते. त्यांनी प्रेमाचा आनंद देते.
किती घेते ती पैसे?
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, मिसी रॉबिनसन प्रोफेशनली कडलिंगचं काम करते आणि यासाठी तिने सेशन व त्यासाठी टायमिंगही ठरवला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये राहणारी मिसी एकट्या आणि निराश लोकांना मिठी मारून त्यांचं दु:खं ऐकते व त्या बदल्यात पैसे घेते. तिचं एक सेशन सामान्यपणे 8 हजार रूपयांचं असतं. 43 वर्षीय मिसी गोल्ड कोस्टमध्ये राहते आणि क्लाइंटने सांगितलेल्या ठिकाणावर जाऊन ती त्यांना मिठी मारते. त्यांचं तणाव दूर करण्यास मदत करते. तिचं हे करिअर भलेही अजब असेल, पण 2010 पासून ती हे काम करत आहे.
कडल थेरपीची डिमांड
मिसीनुसार, जादूच्या झप्पीला कडल थेरपी म्हटलं जातं. तिला ही आयडिया एका टीव्ही शोमधून आली हती. ज्यात तिने प्रोफेशनल कडलरला पाहिलं होतं. ती याला मानसिक समस्यांनी हैराण लोकांसाठी एक समाज सेवा मानते. ती 99 पेक्षा जास्त कडलिंग पोजिशन सांगते, ज्या बेडपासून ते काउचवर वापरल्या जाऊ शकतात.
ती सांगते की, काही लोकांना तिच्या कामाबाबत गैरसमज होतात. पण ही केवळ मिठी मारून तणाव दूर करण्याची सेवा आहे. तिच्या क्लाएंटमध्ये जास्तकरून नोकरी करणारे आणि वृद्ध लोक असता. ज्यांना तणाव दूर करायचा असतो.