(Image Credit : withjoy.com)
सनसेट, डोंगर आणि मस्त वातावरणात आपल्या प्रिय व्यक्तीला लग्नासाठी प्रपोज करण्यासारखी खास गोष्ट नसेल. अनेक कपल्सना तुम्ही डोंगराच्या टोकावर उभे राहून एकमेकांना प्रपोज करताना पाहिले असेल. पण पुरेशी काळजी घेतली नाही तर असं करणं किती महागात पडू शकतं याचं एक उदाहरण समोर आलं आहे. अशीच एक धक्कादायक घटना ऑस्ट्रियातून समोर आली आहे.
ऑस्ट्रियामध्ये प्रियकराच्या लग्नाच्या प्रपोजलला होकार देताच एक प्रेयसी लगेच साधारण ६५० मीटर उंच डोंगराहून घसरून खाली पडली. मात्र या जोडप्याचं नशीब चांगलं होतं. त्यामुळे इतक्या उंचावरून खाली पडूनही ३२ वर्षीय महिलेचा जीव वाचला.
हे कपल ऑस्ट्रियातील फालकार्ट डोंगराववर त्यांचा रोमॅंटिक क्षण एन्जॉय करत होते. तिथे २७ वर्षीय तरूणाने तसाही प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज केलं तसाच तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. मृत्यूच्या दारात असूनही या महिलेलला जीवापेक्षा प्रियकराची आणि त्याच्या प्रेमाची चिंता होती. डोंगराहून खाली पडतानाही ती तिच्या प्रियकराला 'हो' असं उत्तर देत होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रेयसीला खाली पडताना पाहून प्रियकराने तिला वाचवण्यासाठी उडी घेतली. पण तो तिला पूर्ण खाली पोहोचू शकला नाही. उडी घेतल्यावर तो ५० फूटावरच एका ठिकाणी फसला. तरूणी जवळपास ६५० फूट उंच डोंगराहून खाली खाली बर्फावर पडली. त्यामुळे ती जास्त जखमी झाली नाही. एका व्यक्तीने तिला खाली पडलेली पाहून प्रशासनाला माहिती दिली. तेव्हा तिला वाचवलं गेलं.
एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे कपल फारच भाग्यशाली आहे. दोघेही खाली पडले पण सुदैवाने कुणाला काही झालं नाही. दोघेही सुरक्षित आहेत. हे फारच आश्चर्यजनक आहे.