प्रत्येक पती-पत्नीची इच्छा असते की, त्यांचं एक स्वत:चं घर असावं जे ते त्यांच्या हाताने सजवतील आणि त्याची काळजी घेतील. आपलं घर तयार करणं हे काही सोपं काम नाही. अनेकदा तर लोकांकडे घर खरेदी करण्यासाठी पैसेही नसतात. पण काही लोक असेही आहेत ज्यांच्याकडे पैसे आहेत पण इच्छा नाही. अशात एका कपलच्या घराचे काही खास फोटो व्हायरल झाले आहेत. त्यांनी असं घर तयार केलं की, सगळेच हैराण झाले. या कपलने आपल्या हातांनी माती आणि बांबूचं घर तयार केलं. तेही दोन मजली.
पुण्यात राहणारं कपल युगा अखारे आणि सागर शिरूडे यांनी प्लान केला होता की, ते महाराष्ट्राील वाघेश्वर गावात आपलं एक फार्महाऊस तयार करतील. हे फार्महाऊस ते बांबू आणि मातीपासून तयार करणार होते. गावातील लोकांनी त्यांना सांगितलं होतं की या भागात पाऊस जास्त पडतो. त्यामुळे हे घर टिकणार नाही. युगा आणि सागरने त्यांचं काही ऐकलं नाही.
आर्किटेक्ट पती-पत्नीने साकरलं स्वप्नातील घर
द बेटर इंडिया वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, २०१४ मध्ये युगा आणि सागरने पुणे येथील कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं. नंतर सोबत मिळून सागा एसोसिएशन नावाची फर्म सुरू केली. दोघांनी अनेक इमारती आणि घरांचं डिझाइन केलं. पण त्यांचं मातीपासून तयार केलेलं हे घऱ फार खास आहे. त्यांनी या घराला 'माती महल' असं नाव दिलं आहे. रिपोर्टनुसार आताच येऊन गेलेल्या तौकते वादळावेळी त्यांच्या घराचं काहीच नुकसान झालं नाही.
किती आहे घराची किंमत?
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, कपलचं हे घर तयार करण्यासाठी त्यांनी ४ लाख रूपये खर्च आला. त्यांनी घरासाठी लोकल मटेरिअलचा वापर केला आणि अनेक वस्तू रिसायकल केल्या. कपलने सांगितलं की, हे बांधण्यासाठी त्यांनी बांबू, लाल माती आणि गवताचा वापर केला. घरासाठी माती खासप्रकारे तयार केली होती. यात भुसा, गूळ आणि हरडच्या झाडाचा रस वापरण्यात आला होता. त्यानंतर त्यात शेणाचाही वापर केला.
कपलने घराला वेगवेगळ्या वातावरणापासून वाचवण्यासाठी बॉटल आणि डॉब टेक्नीकचा वापर केला आहे. या ७०० वर्ष जुन्या टेक्नीकमध्ये लाकूड किंवा बांबूच्या पट्ट्या ओल्या मातीसोबत जोडल्या जातात. घराच्या भींतीही अशा बनवण्यात आल्या की, ज्या उन्हाळ्यात थंड राहता आणि हिवाळ्यात गरम राहतात. याला कॉब वॉल सिस्टीम म्हणतात.