हे तर सर्वांनाच माहीत आहे की, धुम्रपान करणं आरोग्यासाठी धोकादायक आहे. पण अनेकांना हे माहीत नाही की, सिगारेटच्या फेकलेल्या तुकड्यांपासूनही प्रदूषण पसरतं. सामान्यपणे सिगारेटचे शिल्लक राहिलेले तुकडे रस्त्यावर कुठेही फेकलेले बघायला मिळतात. अनेकदा तर हे तुकडे पक्षीही खातात, ज्यामुळे त्यांना समस्या होते. पंजाबच्या एका व्यक्तीने याच सिगारेटच्या फेकलेल्या तुकड्यांमधून बिझनेस करण्याचा विचार केला आणि आज पाहता पाहता त्याचा बिझनेस सेट झाला.
पंजाबच्या मोहालीमध्ये राहणारे बिझनेसमन ट्विंकल कुमार यांनी सिगारेटच्या बड्समधूनच बिझनेस उभा केला. ते यांना रिसायकल करतातत. त्याच्यांव्दारे खेळणी, कुशन आणि डास पळवणारं औषध तयार करतात.
एएनआयनुसार, लॉकडाऊनमध्ये ट्विंकल यांची नोकरी गेली होती. ट्विंकल कुमारने सांगितलं की, त्यांनी काही काम सुरू करण्यासाठी काही व्हिडीओज बघणं सुरू केलं. तेव्हा त्यांना सिगारेट रिसायकलिंगबाबत माहिती मिळाली. आधी त्यांनी अशा कंपनीला संपर्क केला जे आधीपासून हे काम करतात. त्यांच्याकडून पूर्ण प्रोसेस शिकून घेतली. त्यानंतर मोहालीमध्ये त्यांनी त्यांचं काम सुरू केलं.
बिझनेससाठी त्यांनी सर्वातआधी सिगारेटचे बड्स एकत्र करण्याचा प्लॅन केला. त्यांनी सिगारेटच्या तुकड्यांसाठी सिगारेट विकणाऱ्या दुकानांना संपर्क केला. तिथे काही कंपनीच्या काही महिलांना तैनात केलं. लोकल महिलांना यामुळे रोजगार मिळाला. त्या हे बड्स जमा करत होत्या.
सिगारेटचे बड्स हे सेल्युलोज एसीटेट नावाच्या प्लास्टिकपासून तयार होतात. हे नष्ट होण्यासाठी १० वर्षांपर्यंतचा वेळ लागू शकतो. ते म्हणाले की, फिल्टर केवळ प्रदूषणाचं कारण बनत नाही तर ते निकोटीनसारखे केमिकल्सही रिलीज करतात.
कुमार लोकांना धुम्रपान न करण्याचा सल्ला देतात. ते लोकांना विनंती करतात की, जर तुम्ही सिगारेट ओढत असाल तर त्याचं फिल्टर हे आजूबाजूच्या बॉक्समध्येच टाका. याने प्रदूषणही कमी होईल आणि बड्सचा वापरही केला जाईल.