शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

जगातील सर्वात उंच चिनाब पूल, रेल्वेने शेअर केले अप्रतिम फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 12:25 PM

Chenab Bridge : हा पूल 1.315 किलोमीटर लांब असून त्याची उंची 359 मीटर आहे. चिनाब ब्रिज आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे.

भारतात जगातील सर्वात उंच कमान असलेल्या चिनाब पुलाचे (Chenab Bridge) बांधकाम पूर्ण झाले असून, आता त्यावर रेल्वे रुळ टाकण्याचे काम बाकी आहे. 2022 च्या अखेरीस या पुलाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. हा पूल सिव्हिल इंजिनिअरिंगचा एक अद्भुत नमुना आहे, ज्याद्वारे श्रीनगरला उर्वरित भारताशी जोडले जाईल. 

भारतीय रेल्वेने ट्विटरवर चिनाब पुलाचे काही फोटो शेअर केले आहेत, ते पाहून सर्वजण आश्चर्यचकित होत आहेत. चिनाब ब्रिज या पुलाचे बांधकाम कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) आणि उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (USBRL) प्रकल्पाचा भाग आहे. 14 ऑगस्ट 2022 रोजी, रियासी जिल्ह्यातील कौरी भागात चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाच्या वरच्या डेकचे काम पूर्ण झाले.

हा पूल 1.315 किलोमीटर लांब असून त्याची उंची 359 मीटर आहे. चिनाब ब्रिज आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे. भारतात बांधला जात असलेला हा पूल जगातील सर्वात उंच आर्क पूल आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंच्या सलाल-ए आणि दुग्गा रेल्वे स्थानकांना रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीशी जोडेल. रेल्वेने पुलाचे काही अतिशय प्रेक्षणीय असे फोटो प्रसिद्ध केले आहेत. 

आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंचकटरा-बनिहाल रेल्वे सेक्शनवर उत्तर रेल्वेकडून चिनाब पूल बांधला जात आहे, ज्याची अंदाजे किंमत  27949  कोटी रुपये आहे. चिनाब पूल उधमपूर-कटरा-कांजीगुंडला जम्मूशी जोडेल. चिनाब पूल नदी पातळीपासून 359 मीटर उंच आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल होण्याचा मान या पूलाला मिळणार आहे. हा पूल फ्रान्समधील आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे. 

'टेकला' सॉफ्टवेअरचा वापरया जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाच्या कमानीचे काम एप्रिल 2021 मध्येच पूर्ण झाले. या कमानीचे एकूण वजन 10619 मेट्रिक टन असून त्याचे भाग भारतीय रेल्वेने प्रथमच केबल क्रेनद्वारे उभारले आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पुलाच्या स्ट्रक्चरल डिटेलिंगसाठी 'टेकला' सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये वापरलेले स्ट्रक्चरल स्टील मायनस 10 डिग्री सेल्सिअस ते 40 डिग्री सेल्सिअस तापमानाला तोंड देऊ शकते.

टॅग्स :railwayरेल्वे