मोबाइल टॉवरवर चढला होता तरूण, समोसा-कचोरी दिल्यावरच उतरला खाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 06:51 PM2021-07-30T18:51:51+5:302021-07-30T18:52:46+5:30
जिल्ह्यातील सुल्तानगंजमध्ये विक्षिप्त टॉवरवर चढून डान्स करू लागला आणि काही वेळाने शक्तिमानची नक्कर करू लागला होता.
मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यात एक विक्षिप्त तरूण मोबाइल टॉवरवर चढला होता. इतकंच नाही तर टॉवर चढून डान्स करत तर शक्तिमानची नक्कलही करत होता. तिथे उपस्थित लोकांनी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. पण तो काही ऐकला नाही. अखेर पोलिसांनी त्याला समोसे आणि कचोरीचं आमिष दिलं. तेव्हा तो खाली उतरला.
जिल्ह्यातील सुल्तानगंजमध्ये विक्षिप्त टॉवरवर चढून डान्स करू लागला आणि काही वेळाने शक्तिमानची नक्कर करू लागला होता. मोबाइल टॉवरवर उभ्या असलेल्या तरूणाला पाहून लोक हैराण झाले आणि त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न करू लागले होते. पण अखेर त्यांना हार मानून पोलिसांना बोलवावं लागलं. त्यानंतर पोलीस अधिकारी काही पोलिसांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. (हे पण वाचा : बाबो! चोरून चोरून वाचत होती पतीच्या फोनमधील मेसेज, पत्नीला तुरूंगवासाची शिक्षा)
मोठ्या प्रयत्नांनंतर तरूण खाली येण्यासाठी तयार झाला. पोलीस अधिकारी सुरेंद्र लोधी आणि गोविंद मीणाला बोलवण्यात आलं. दोघांना समोसे-कचोरी घेऊन टॉवरवर चढवण्यात आलं. नाश्त्याचं आमिष दिल्यावर तरूण खाली उतरण्यास तयार झाला. नंतर त्याला गोष्टींमध्ये गुंतवून खाली उतरवण्यात आलं.
तरूण खाली आल्यावर खाली उपस्थित लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला. असं सांगितलं गेलं की, तरूण मानसिक रूग्ण आहे. तो नेहमीच अशाप्रकारची विचित्र कामे करत असतो.