कोणत्याही व्यक्तीसाठी लग्न ही आयुष्यातील मोठी गोष्ट असते. अनेकजण लग्नाबाबत वेगवेगळी स्वप्ने रंगवत असतात. सुखी संसार कसा व्हावा यांचं प्लॅनिंग करत असतात. जबाबदाऱ्या वाटून घेतात. लग्न हा आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. सामान्यपणे एकदाच आणि व्यक्तीशी लग्न केलं जातं. पण राजस्थानच्या (Rajasthan) चित्तोडगढ (Chittorgarh) येथे राहणाऱ्या एका तरूणीने डझनभर पुरूषांसोबत लग्न केलं (Bride Married To Dozens Of Grooms) आणि पळून गेली. पोलिसांना अजूनही तिने केलेल्या लग्नांची नेमकी आकडेवारी माहीत नाही.
दैनिक भास्करमध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, डझनभर पुरूषांसोबत लग्न करणाऱ्या या तरूणीचं नाव नेहा आहे. पोलिसांनी सांगितलं की, नेहा आणि तिचे साथीदार सीमा शेख व लक्ष्मी यांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. (हे पण वाचा : सूनेसोबत पळून जाऊन सासऱ्याने केलं लग्न, दोन वर्षाच्या बाळाला घेऊन घरी परतले आणि...)
कसा झाला भांडाफोड?
लग्नाच्या नावावर दगा देणाऱ्या या गॅंगचा भांडाफोड तेव्हा झाला जेव्हा नेहाने स्वत: तिच्या आईसोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून सीमा शेख, साबिर खान आणि लक्ष्मीची तक्रार केली. तिच्यानुसार त्यांनी तिला किडनॅप केलं होतं. ती मोठ्या मुश्कीलीने त्यांच्या तावडीतून सुटली. पण पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी केली तेव्हा नेहाच या गॅंगची मास्टरमाइंड निघाली. सीमा शेख, साबिर खान आणि लक्ष्मी तिचे साथीदार निघाले.
आईला कानोकान खबर नव्हती
दरम्यान नेहाच्या आईला आपल्या मुलीच्या या कारनाम्याबाबत कानोकान खबर नव्हती. नेहा वेगवेगळी कारणे करून घरातून निघून जात होती आणि लग्न करत होती. त्यानंतर ती संधी मिळताच लग्न केलेल्या पुरूषांच्या घरातून पळून जात होती. नेहा आईला कधी सांगत होती की, ती मैत्रिणीच्या लग्नाला जाते तर कधी सांगत होती की, मैत्रिणींसोबत फिरायला जात आहे.
दरम्यान साधारण एक महिन्याआधी नेहाने जयरामसोबत लग्न केलं होतं. पण यावेळी नेहा नवरदेवाच्या घरात अडकली आणि एक महिन्यांपर्यंत ती तिथून पळून जाऊ शकली नाही. नंतर नेहा घरी आली तेव्हा तिला तिच्या आईने विचारलं की तू कुठे होती? तेव्हा सांगितलं की, तिला किडनॅप करण्यात आलं होतं आणि संधी मिळताच ती पळून आली.